आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहर पोलिसांची कारवाई; दोघांना पोलिस कोठडी‎:कॅश हिसकावणाऱ्या भामट्यांना‎ शेगावातून आणले यवतमाळात‎

यवतमाळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बँकेतून पावणे दोन लाखाची रोख काढून‎ दुचाकीने घरी जात असलेल्या एका‎ व्यक्तीच्या दुचाकीला लाथ मारून‎ अनोळखी दुचाकीस्वारांनी ती रोख जबरीने‎ हिसकावून पळ काढला होता. ही घटना‎ सोनार लाईन परिसरात काही दिवसापूर्वी‎ घडली होती. त्यानंतर ह्या टोळीला दरोडा‎ टाकण्याच्या प्रयत्नात असतांना बुलडाणा‎ एलसीबीने अटक केली होती. या‎ प्रकरणातील संशयित दोघांना शहर‎ पोलिसांनी शेगाव पोलिसांच्या ताब्यातून घेत‎ यवतमाळात आणले.‎ जिगनेश उर्फ जिग्नू घासी वय ४४ वर्ष‎ आणि अजय तमंचे वय ४२ वर्ष दोघेही रा.‎ अहमदाबाद, गुजरात अशी ताब्यात घेण्यात‎ आलेल्या दोन संशयित आरोपींची नावे‎ असून त्या दोघांना न्यायालयाने‎ शनिवारपर्यंतची पोलिस कोठडी सुनावली‎ आहे.‎

या प्रकरणी पोलिस सूत्रांकडून‎ मिळालेल्या माहितीनूसार, शहरातील‎ माळीपुरा येथील लक्ष्मीनारायण प्रताप‎ यांच्या घराचे बांधकाम असल्याने ते पैसे‎ काढण्यासाठी पंजाब नॅशनल बँकेत मुलगा‎ सागर याच्यासोबत गेले होते. दरम्यान‎ बँकेतून एक लाख ७६ हजार रूपयाची रोख‎ काढून ते दुचाकी क्रमांक‎ एमएच-२९-एसी-७९९८ मुलगा सागर‎ याच्यासोबत दुचाकीने घरी जाण्याकरता‎ निघाले.‎ याचवेळी सोनार लाईन परिसरात श्याम‎ टॉकीजकडून दुचाकीने दोन अनोळखी‎ व्यक्तीने येवून प्रताप यांच्या दुचाकीजवळ‎ येवून दुचाकीला लाथ मारली आणि‎ लक्ष्मीनारायण प्रताप यांच्याजवळील‎ पैश्याची बॅग जबरीने हिसकावून बालाजी‎ चौकाकडे पळ काढला.‎

या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात‎ अनोळखी दुचाकीस्वार चोरट्यांवर विविध‎ कलमान्वये गुन्हे नोंद करण्यात आले आहे.‎ घटनेचे गांभीर्य लक्षात घेता शहर पोलिसांनी‎ सिसिटिव्ही फुटेजच्या आधारे शोधमोहीम‎ सुरू केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी‎ बुलडाणा एलसीबीने दरोड्याच्या प्रयत्नात‎ असलेल्या तिघांना शेगाव-बाळापूर‎ मार्गावरून ताब्यात घेतल्याचे समोर आले.‎ दरम्यान यवतमाळ शहर पोलिसांनी शेगाव‎ गाठून पाहणी केली. तसेच यवतमाळातील‎ घटनेबाबत चौकशी केली असता, त्या‎ टोळीने गुन्ह्याची कबूली दिली होती.‎