आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लंपास:महिलेच्या बॅगेतून दागिन्यांसह रोख लंपास

कळंब13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बसमध्ये चढत असलेल्या महिलेच्या बॅग मधील सोन्याचे दागिने आणि रोख असा ३७ हजार रूपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला. ही घटना बुधवारी दुपारच्या सुमारास कळंब बसस्थानक परिसरात घडली. या प्रकरणी निता पद्माकर सातपुते वय ३७ वर्ष रा. वरझडी यांनी कळंब पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

यवतमाळ तालुक्यातील वरझडी येथील महिला निता सातपुते ही भाऊबीजेसाठी पुलगाव येथे राहत असलेला भावाकडे जाण्यासाठी कळंब बसस्थानकावर आल्या होत्या. दरम्यान बसमध्ये चढत असतांना गर्दीचा फायदा घेत सातपुते यांच्या पर्समधील े दागिने आणि रोख लंपास केली.

बातम्या आणखी आहेत...