आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानागपूरवरून हैद्राबादकडे गोवंश घेऊन जाणाऱ्या ट्रकला रोखण्यात वडकी पोलिसांना यश आले असून यामध्ये १६ गोवंशाची सुटका करत २६ लाख ४० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई शुक्रवारी राष्ट्रीय महामार्गावर करण्यात आली. मात्र अंधाराचा फायदा घेत ट्रक चालक फरार होण्यात यशस्वी झाला.
वडकी पोलिस स्टेशन हद्दीतून राष्ट्रीय महामार्ग ४४ वरून अवैधरीत्या गोवंशाची तस्करी होत असल्याची माहिती ठाणेदार विनायक जाधव यांना मिळाली. त्यावरून त्यांनी शुक्रवारी रात्री पथकासह देवधरी घाटात सापळा रचून वाहनाची तपासणी सुरू केली. तेव्हा ट्रक (एमएच ४०, वाय ९०८२) संशयीतरित्या आढळून आला. दरम्यान पोलिसांनी चालकाला वाहन थांबवण्यास सांगितले असता, चालकाने ट्रक सोडून पळ काढला. त्यानंतर वाहनाची तपासणीत १६ जनावरे असल्याचे आढळून आले. दरम्यान पोलिसांनी पंचासमक्ष फरार आरोपीविरोधात गुन्हा नोंद करून ट्रकसह एकूण २६ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांचा मार्गदर्शनात वडकी ठाणेदार विनायक जाधव, अंमलदार विकास धडसे, किरण दासरवर, विकास धावर्तीवार, विनोद नागरगोजे, विलास जाधव यांनी पार पाडली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.