आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तम प्रतिसाद:वृक्ष लागवड करून अमृत महोत्सव साजरा

उमरखेड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशाला स्वातंत्र्य मिळवून ७५ वर्ष पूर्ण झाले असल्यामुळे संपूर्ण देशभरात आजादी का अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी हर घर तिरंगा अभियान देशातील सर्वांनी सामूहिक रित्या साजरा केला. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला.तिरंगा आपला प्राण आहे आणि प्राणाला जगण्यासाठी प्राण वायू लागतो, प्राण वायू वृक्षा पासून मिळतो. त्यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल हा अमृत महोत्सव वृक्ष लागवड करून साजरा करण्यात आला. या मध्ये १२०० विद्यार्थी, शिक्षक, गावकरी मंडळींनी सहभाग घेतला.

सोमवार, दि. २२ ऑगस्ट रोजी श्रावण सोमवार निमित्त पर्जनेश्वर महादेव मंदिर पर्जन्याच्या पायथ्याशी आणि भुजप्पा महादेव मंदिर ब्राम्हणगाव आणि संत तेजमल गांधी यांच्या समाधी परिसरात ४५१ सीताफळ कलम आणि १५०० सीड बॉल चे रोपंन करून भविष्यात या परिसरास असलेला कार्बन डायऑकसाईडचे विघटन होऊन कार्बन हा झाडांमध्ये साठून उरलेला प्राणवायू हा आपल्यालाच हे वृक्ष परत करणार आहेत. या अभियानास सरपंच परमात्मा गरुडे, परजनाचे सरपंच स्वाती वाघमारे, चातारी सरपंच रंजना संतोष माने, शिंदगीचे उपसरपंच तास्के, गजानन कोंडरवार, नयन पुदलवाड, आनंद माने, शिवाजी नरवाडे, गजानन माने, भिमराव वाठोरे, चंद्रकांत पवार तसेच परजना गावचे सरपंच अंकुश वाघमारे, गजानन वाघमारे, चांदराव वाघमारे, निळकंठ वाघमारे, रघुनाथ वाघमारे, अशोकराव निम्मलवाड, भुजंग उंद्रटरवाड, गजानन कोंडरवाड, रत्नाकर मुक्कावार, शुभाष कोंडरवाड, रामदास घोडेकर तसेच सिंदगी गावचे उपसरपंच किसनराव तास्के, ब्राम्हणगवचे उपसरपंच गोरे, शिवाजी रंन्दे, अरविन्द धबडगे तसेच कृषि महाविद्यालय कुपटीचे प्राचार्य चिंतले व शिक्षकवृंद, भाउसाहेब माने, प्राचार्य गिरी, शिरफुले तसेच मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक वृंद यांनी वृक्ष लागवड मोहीम यशस्वी केल्या बद्दल कौतुक करून त्यांचे डॉ. विजयराव माने यांनी अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...