आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्धापन दिन:घाटंजी येथे लालपरीचा 75 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहाने साजरा

घाटंजीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील सर्वसामान्यांचा दळणवळणाचा कणा असलेली लालपरी आता ७५ व्या अमृत महोत्सव वर्षांची झाली आहे. या लालपरीचा म्हणजेच एसटीचा ७५ वा अमृत महोत्सव वर्धापनदिन बुधवार, दि. १ जून रोजी घाटंजी बसस्थानक येथे मोठ्या उत्साहाने व सर्व प्रवाशी बांधवाचे स्वागत करुण साजरा करण्यात आला.

राज्यातील लाखो प्रवाशांची लोक वाहिनी ठरलेल्या लालपरी म्हणजे एसटीने काळानुसार कात टाकली असून अनेक स्वागतार्ह बदलही केले आहेत. एसटी म्हणजे केवळ प्रवाशांची वाहतूक करणारी यंत्रणा एवढेच मर्यादित नसून एसटीने सातत्याने सामाजिक बांधिलकी जपली आहे. राज्यावर आलेल्या दुष्काळासारख्या नैसर्गिक आपत्तीत एसटीने नेहमीच मदतीचा हात पुढे केला आहे. मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात राहता यावे यासाठी एसटीने पुढाकार घेत प्रवासात सवलती दिल्या आहेत.

असेही वाहतूक नियंत्रक अरूण गोहाडे यांनी सांगितले. एसटीने लालपरीपासून सुरू केलेला प्रवास हिरकणी, शिवनेरी, शिवशाही ते विठाई असा सुखद टप्प्यावर आणला आहे. एसटीचा हा ७५ वा वर्धापनदिन राज्यातील सर्व एसटी बस स्थानकांवर उत्साहात साजरा करण्यात आला असून घाटंजी येथील सेवानिवृत्त वाहक केशवराव शिगेंवार यांना शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी ज्ञानेश्वर लांजेवार, मधुकर नगराळे, राजू मंगाम, जय विष्णू मडावी, संतोष पोटपिल्लेवार, नरेश मेहता, गोलू गांवडे, ताराचंद भाऊ, चालक, व महिला वाहक, उपस्थित होत्या.

बातम्या आणखी आहेत...