आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्णी:राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन वृक्षारोपणाने साजरा

आर्णी17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी मिळून आर्णी येथील माहूर चौकातील स्मशान भूमी व मुस्लिम कब्रस्तान येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्याचे नेते माजी आमदार राजू तोडसाम व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष युनूस शेख यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचा २३ वा वर्धापन दिन शुक्रवार, दि. १० जून रोजी वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार राजू तोडसाम, जिल्हा उपाध्यक्ष युनूस शेख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप पवार, साबीर शेख, राजीक शेख, चेतन गुल्हाने, देवानंद पवार, आकाश राठोड, दानिश भातनासे, स्वप्नील, नंदकिशोर पंडित, सूरज जाधव, कृष्णा पेंडपवार, किसना लडके, राजू कनाके, जमील शेख, शकील शेख, मंगेश पाटील बुतले, दानिश शेख, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...