आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेडक्रॉस दिवस:टीडीआरएफ मुख्यालयात जागतिक रेडक्रॉस दिवस साजरा ; रेडक्रॉसचे संस्थापक हेन्री ड्युनंट यांना करण्यात आले अभिवादन

यवतमाळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात कार्य करण्यासाठी अधिकृत असलेल्या टिडीआरएफला सोमवार, दि. ९ मे रोजी १७ वर्षे पूर्ण होत आहे. त्या निमित्त टिडिआरएफ द्वारा दि. १ मे ९ मे पर्यंत हरिश्चंद्र राठोड यांच्या मार्गदर्शनात टिडीआरएफ वर्धापन दिवस सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी मुख्यालयात जागतिक रेडक्रॉस दिनानिमित्त एनएनएस, एनसीसी, टीडीआरएफ व समाजकार्य विद्यालयाचे विद्यार्थी व स्वयंसेवक यांचेसाठी राष्ट्रसेवेत योगदान विषयावर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भारत स्काउट गाईडचे जिल्हा संघटक गजानन गायकवाड, एनसीसी कंपनी कमांडर कमलेश तुमसरे, रामकृष्ण आश्रमचे रमेश डहाके होते. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून संचालक हरिश्चंद्र राठोड यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना व स्वयंसेवकांना रेडक्रॉस ची स्थापना व इतिहास व रेडक्रॉस च्या चिन्हाबाबत जनजागृती, स्थापना व इतिहास सोबतच युवकांचे राष्ट्रसेवेत योगदान या विषयावर मार्गदर्शन केले.

त्यानंतर भारत स्काउट गाईडचे जिल्हा संघटक गजानन गायकवाड, एनसीसी कंपनी कमांडर कमलेश तुमसरे, रामकृष्ण आश्रमचे रमेश डहाके यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संचालक राठोड यांच्या नेतृत्वात रुपाली राठोड, अभिषेक राजहंस, शुभम बैस, मोहमद जिलानी अन्सारी, किरण चव्हाण, अभय संदलवार, यशवर्धन राठोड यांनी कार्य केले. कार्यक्रमासाठी मनोज राठोड, आयटीआय. एनएनएस कार्यक्रम अधिकारी पोटे व विविध महाविद्यालयाचे स्वयंसेवक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...