आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमरावती पदवीधर मतदार संघात ऐतिहासिक विजय संपादन करणारे महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे यांच्या विजयाबद्दल ४ फेब्रुवारी रोजी माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्या नेतृत्वात गांधी चौकातील जनसंपर्क कार्यालयासमोर जल्लोष करण्यात आला. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष गणेश माने, शिवसेनेचे संघटक रवी महाले, तालुका प्रमुख बंडू बोदडे, शहर प्रमुख विजय इंगळे, उपतालुका प्रमुख विजय बोर्डे, काँग्रेस शहर अध्यक्षा सरस्वती खासने, महिला काँग्रेसच्या शहर अध्यक्ष सुरजित कौर सलुजा, शेगाव तालुका काँग्रेस अध्यक्ष विजय काटोले, माजी नगरसेवक किशोरअप्पा भोसले, सुरेश वनारे, सुरेशसिंह तोमर यांची उपस्थिती होती.
विधानसभा मतदार संघातील पदवीधर मतदारांनी धीरज लिंगाडे यांना आशीर्वादरूपी मते देऊन विजयी केल्याबद्दल माजी आमदार दिलीप सानंदा यांनी सर्व मतदारांचे आभार मानले. या वेळी महाविकास आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी ढोलताशांच्या निनादात फटाक्यांची आतषबाजी केली. याप्रसंगी संतोष देशमुख, वर्षा इंगोले, प्रमिला चोपडे, नीलेश पारस्कर, दिनेश पंतगे, विकास चव्हाण, शेख सलीम, सरपंच विनोद मिरगे, सरपंच नीलेश देशमुख, अब्दुल रशीद अब्दुल लतीफ, इब्राहिमखाँ सुभानखाँ, मो. नईम, परवेज खान पठाण यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.