आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अष्टभुजा दुर्गोत्सव मंडळ:नवरात्रीनिमित्त नारी शक्तीचा सत्कार सोहळा‎

उमरखेड‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उमरखेड‎ येथील स्थानिक अष्टभुजा दुर्गोत्सव मंडळ‎ यांच्या संकल्पनेतून नारी शक्ती मातेचा‎ सन्मान करण्याचा उपक्रम शुक्रवार, दि. ३०‎ सप्टेंबर रोजी शहरातील विविध क्षेत्रात‎ उल्लेखनीय व मोलाची कामगिरी‎ करणाऱ्या नारी शक्ती मातेचा सत्कार‎ अष्टभुजा दुर्गात्सव मंडळ च्या वतीने‎ मान्यवर महिलांच्या हस्ते थाटात पार‎ पडला.‎आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य‎ करणाऱ्या जैतूनबी शेख शब्बीर व‎ बालमनी बालकिशन नांदेडकर तसेच‎ दायीमा व आयुर्वेदिक उपचार म्हणून‎ गर्भवती महिलांच्या वेदनेपासून तर प्रसूती‎ पर्यंत लक्ष देणाऱ्या गयाबाई विश्वनाथ‎ आलट, इंदुबाई शिवरामजी कलाने,‎ लक्ष्मीबाई किसनराव जोगदंड, हिराबाई‎ नथू दिवेकर, इंदुबाई भगवान इंगळे,‎ चंद्रभागाबाई मारोतराव टकले या मातेचा‎ विशेष कार्याबद्दल यांना साडीचोळी देऊन ‎ यावेळी मान्यवर महिलांच्या हस्ते सत्कार ‎करण्यात आला.

तसेच नगर परिषद येथे‎ सफाई कामगार म्हणून सेवानिवृत्त‎ झालेल्या गीताबाई किशोर पटोणे या‎ महिलांचाही उल्लेखनीय कार्य केल्या‎ बद्ल कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. सामाजिक क्षेत्रात गर्भवती मातेचा इलाज‎ करून खऱ्या अर्थाने नारी शक्तीचा सन्मान‎ करणाऱ्या या मातेला पुरुषप्रधान‎ संस्कृतीला विशेष परिचय करून देणाऱ्या‎ सदरहू कर्तबगार महिलांचा भावनिक‎ सत्कार एपीआय सुजाता बनसोड, वैशाली‎ प्रवीण कुमार वानखेडे ,तेजश्री संतोष जैन,‎ मीना चेके व महिला पत्रकार सविता चंद्रे‎ यांच्या हस्ते साडी चोळी देऊन करण्यात‎ आला. एकूण नऊ नारी शक्तीचा सत्कार‎ व सन्मान या ठिकाणी प्रत्यक्ष डोळ्यांनी‎ बघावयास मिळाला. सदरहू आयोजित‎ सत्कार कार्यक्रमाला शहरातील व‎ परिसरातील महिला व ज्येष्ठ नागरिक,‎ युवक, युवती तसेच अष्टभुजा दुर्गोत्सव‎ मंडळातील सदस्य यांच्या समवेत नारी‎ शक्ती मातेचा सत्कार सोहळा झाला.‎ कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरविंद‎ ओझलवार तर संचालन शीतल प्रफुल्ल‎ कोमलवार यांनी केले. आभार प्रदर्शन‎ मनीषा अरविंद ओझलवार यांनी केले.‎

बातम्या आणखी आहेत...