आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानागपूर येथे मध्यवर्ती कारागृह कवायत मैदानावर कारागृह विभाग वार्षिक क्रीडा स्पर्धा झाल्या. या स्पर्धेत यवतमाळ जिल्हा कारागृहाच्या कर्मचाऱ्यांनी आपली मोहर उमटविली. एकूण क्रीडा प्रकारात दहा सुवर्ण पदक, तर दोन रौप्य पदक प्राप्त केले. एकूण सहा कर्मचारी या स्पर्धेत चमकले. यवतमाळ जिल्हा कारागृह अधीक्षक कीर्ती चिंतामणी यांच्या मार्गदर्शनात येथील कर्मचाऱ्यांची चमू स्पर्धेत सहभागी झाले, बॅडमिंटन एकेरी-दुहेरी, भाला फेक यामध्ये दीपा मधुकर कांबळे हिने तीन सुवर्ण पदक मिळविले, तर मंगेश पन्नालाल प्रजापती यांनी दोन सुवर्ण पदक मिळविले.
श्रीनिवास शिवाजी शिंदे यांनी कुस्ती, भाला फेक यामध्ये सुवर्ण, तर कराटेमध्ये रौप्य पदक पटकावले. महेश वाकोडे यांनी कुस्ती, कराटे यात सुवर्ण पदक मिळविले. संजय मधुकर ठोकळ यांनी कुस्तीमध्ये रौप्य पदक घेतले. राहुल लक्ष्मणसिंग बर्वे यांनी बॅडमिंटनमध्ये सुवर्ण पदक प्राप्त केले. एकंदरच या खेळाडूंनी दमदार कामगिरी करीत पदकांची लयलूट केली. सततचा सराव व वेळोवेळी मिळालेले मार्गदर्शन यामुळे कारागृह कर्मचाऱ्यांनी सुवर्ण पदक पटकाविले. त्यांच्या यशाचे कौतुक करण्यात येत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.