आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वार्षिक‎ सर्वसाधारण सभा:चैतन्य अर्बनची वार्षिक‎ आमसभा उत्साहात‎

यवतमाळ‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सभासदांनी सभासदासाठी‎ सभासदाद्वारा संचालित आर्थिक‎ संस्था म्हणजेच सहकारी पतसंस्था.‎ चैतन्य अर्बन ही औपचारिक‎ विधिवत संस्था असली तरी मूलतः‎ हे परस्पर विश्वास, प्रेम व‎ आपुलकीने बंदिस्त एक विस्तारित‎ कुटुंबच आहे. दोन वर्षांचा‎ कोरोनाच्या नकोशा कालखंडानंतर‎ या वर्षी संस्थेची वार्षिक‎ सर्वसाधारण सभा संभाजी नगर येथे‎ उत्साहात पार पडली.‎

या वेळी अध्यक्ष बापूसाहेब‎ पाटील यांच्या नेतृत्वाला समर्पक‎ नाथ देगा या त्यांच्या सुविध‎ सहधर्मचारिणी वृषाली पाटील यांनी‎ आत्मीयतेने व जिव्हाळ्याने‎ नियोजित व संचालित केलेल्या या‎ उत्सवास संस्थेचे सर्व संचालक,‎ कर्मचारी, भागधारक व हितचिंतक‎ व विशेष अतिथी उपस्थित होते. या‎ वर्षी सर्वसाधारण सभेस प्रमुख‎ पाहुणे म्हणून सहकार विभागाचे‎ वरिष्ठ अधिकारी, सेवानिवृत्त‎ प्राचार्य के. आर. नगराळे तथा‎ सहकारी बोर्डाचे अधिकारी चदंन,‎ नगरसेवक सुजित राय लाभले होते.‎ संस्थेच्या अहवालाचे वाचन‎ चैतन्यचे मुख्य कार्यपालन‎ अधिकारी जगदीश धोबे यांनी केले.‎

चैतन्य अर्बनचे अध्यक्ष बापूसाहेब‎ पाटील यांनी संस्थेच्या प्रगतीचा‎ आढावा व भविष्यातील योजना व‎ नियोजन याचा परामर्श सर्व‎ उपस्थितांच्या आकांक्षा व अपेक्षा‎ ह्यांना फलद्रुप करेल, असे‎ आश्वासन दिले. चैतन्यच्या मुग्धा‎ मोहगावकर यांनी केलेल्या‎ ओघवत्या निवेदनाने व चैतन्यच्या‎ व्यवस्थापक किरण वांद्रेकर यांच्या‎ सर्वंकष आभार प्रदर्शनाने व‎ चैतन्यच्या उज्वल परंपरेनुसार‎ सुग्रास स्नेहभोजनाने या उत्सवी व‎ उत्साही पर्वाची सांगता झाली.‎

बातम्या आणखी आहेत...