आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीरुगिरी:चक्क जिल्हाधिकारी कार्यालयाच्या टॉवरवर चढून 6 तास केली वीरुगिरी; शासकीय जमिनीवरील अतिक्रमण, स्वत:वरचे गुन्हे मागे घेण्याची मागणी

यवतमाळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासकीय जमिनीवरील अतिक्रमण काढण्याबाबत, तसेच स्वत:वर दाखल असलेले गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसाठी मंगळवार, दि. १० मे रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या टॉवरवर चढून दिग्रस येथील श्याम गायकवाड याने वीरूगिरी आंदोलन केले. या आंदोलनामुळे खळबळ उडाली होती. अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर तब्बल सहा तासानंतर तो खाली उतरला.

दिग्रस तालुक्यातील इसापूर येथील श्याम गायकवाड हा यापूर्वी अनेकदा टॉवरवर चढला आहे. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या टॉवरवर चढून त्याने प्रशासनाला जेरीस आणले. शासकीय जमिनीवरील अतिक्रमण काढण्याची मागणी त्याने लावून धरली. दिग्रस तालुक्यातील इसापूर येथील शेत सर्व्ह नंबर ७ या शाळेच्या जमिनीवरील आणि काही शासकीय जमिनीवरील अतिक्रमण काढून ती जमीन गरिबांना वाटप करण्यात यावी, तसेच आपल्यावरील जुना आत्महत्येचा गुन्हा मागे घेण्याच्या मागणीसाठी तो टॉवरवर चढला.

या घटनेची माहिती मिळताच निवासी उपजिल्हाधिकारी ललित कुमार वऱ्हाडे, आपत्ती पथक, अग्निशमन दल दाखल झाले. अधिकाऱ्यांनी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो कुणाचे काही ऐकण्याच्या मानसिकतेत नव्हता.

बातम्या आणखी आहेत...