आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या पाच दिवसीय हवामान अंदाजानुसार जिल्ह्यात येत्या तीन दिवसांत हवामानामध्ये अवकाळी पाऊस, सुसाट वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. येत्या दि. १४ ते १७ मार्च या दरम्यान मेघगर्जना सह विजांचा कडकडाट अवकाळी पावसाची शक्यता आहे. तर १८ मार्च रोजी वादळी वाऱ्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे किमान व कमाल तापमानात बदल होणे अपेक्षित आहे. यादरम्यान आपल्या आरोग्यासोबतच पिकाच्या आरोग्याची देखील शेतकरी बांधवांनी काळजी घेणे गरजेचे आहे.हरभरा परिपक्वतेच्या काळात घाटे आणि पाने पिवळी पडत असताना ओलीत बंद ठेवावे.
परिपक्व झालेल्या हरभरा पिकाची त्वरित कापणी करावी, पुढील दिवसांमध्ये येणाऱ्या अवकाळी पावसा आधी कापणीस उशीर झाल्यास घाटे तुटून पडल्याने उत्पादनात घट होऊ शकते. गहु पिकात दाणे भरण्याच्या अवस्थेत उंदीर व्यवस्थापन करण्यासाठी उंदराचे शेतातील पर्यायी अन्न स्त्रोत नष्ट करावेत तसेच शेतातील बिळे बंद करावीत. यासोबतच भाजीपाला व फळबागांना नियमितपणे ओलीत करावे व ओलितासाठी सुक्ष्म सिंचन पद्धतीचा अवलंब करावा, जेणेकरून मेघगर्जनेसह वादळ वारे व पाण्याचा कार्यक्षम वापर होण्यास मदत होईल.
पाण्याचा अपव्यय टाळता येईल. कोंबड्यांच्या शेडमध्ये पक्षांची गर्दी टाळावी, शेडच्या आकारमानानुसार आवश्यक तेवढ्याच कोंबड्या ठेवाव्यात. तसेच अवकाळी पावसामुळे जनावरांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था करून ठेवावी. शेतात तयार झालेला मालावर ताड पट्टी टाकून त्याला सुरक्षित करावे. पालेभाज्या फळे हे सुद्धा खराब होऊ नये म्हणून त्याची देखील ठेवण्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.