आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचटोपाध्याय लागू झाल्यानंतर शिक्षकांच्या वेतनात तुटपुंजी वाढ होत आहे. हा प्रकार अन्यायकारक असून, यासंदर्भात औरंगाबाद खंडपीठात रिटपिटीशन याचिका दाखल करण्यात आली आहे.डिएड् ही शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या प्राथमिक शिक्षकांनी सलग बारा वर्ष सेवा बजावल्यानंतर वरिष्ठ वेतन श्रेणी (चटोपाध्याय) लागू करण्यात येते.
वरिष्ठ वेतन श्रेणी लागू झाल्यानंतर सहाव्या वेतन आयोगानुसार मूळ पगारामध्ये ३ हजार ४०० रूपये, तर एकूण वाढ जवळपास पाच हजार रुपयापर्यंत होत होती, परंतु सातव्या वेतन आयोगात ही वाढ कमी झाली आहे. सातव्या वेतन आयोगानुसार मूळ पगारात केवळ सातशे रुपये आणि एकूण पगारात जवळपास एक हजार रुपये एवढी वाढ होते. त्यामुळे ही वेतन त्रुटी दूर करावी, ह्या मागणीसाठी शिक्षक संघटनांनी वेळोवेळी शासनाकडे निवेदन दिली, परंतू निवेदनावर कुठल्याही प्रकारचा सकारात्मक निर्णय घेण्यात आला नव्हता. शेवटी शिक्षक संघटनेच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेण्यात आली होती. तद्नंतर औरंगाबाद खंडपीठाने २२ टक्क्यापर्यंत वाढ करावी, असे निर्देश दिले आहे. दरम्यान, बक्षी समिती खंड दोनमध्ये त्रुटी दूर करण्यासाठी आता पुन्हा पीटिशन दाखल करण्यात आले आहे.
नव्याने बोलावले चटोपाध्यायचे प्रस्ताव
सलग बारा वर्ष सेवा झालेल्या ४२ प्राथमिक सहाय्यक शिक्षक, पदवीधर सहाय्यक शिक्षकांसह उच्च श्रेणी मुख्याध्यापकांना वरिष्ठ श्रेणी लागू झाली आहे. या बाबत आदेश नुकतेच निर्गमित करण्यात आले. आता नव्याने प्रस्ताव बोलावले असून, ५० हून अधिक प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. बहुतांश प्रस्तावात त्रृट्या असून, ह्या त्रृट्या दुरूस्त केल्यानंतरच प्रस्तावाला हिरवी झेंडी मिळणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.