आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापीव्हीसी रेझीनचे मटेरियल देण्याच्या नावाखाली बारा लाख एक हजार रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार राजेश छबिलदास पतीरा वय ४८ वर्ष, रा. राजेंद्र नगर यांनी मंगळवार, दि. ६ डिसेंबर रोजी अवधूत वाडी पोलिस ठाण्यात दिली. त्यावरून आकाश माधवराव वाकोडे, रा. अहमदाबाद, गुजरात याच्याविरोधात पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा नोंद केले आहे.
राजेश छबिलदास पतीरा यांची पीव्हीसी पाईप बनवण्याची कंपनी एमआयडीसी परिसरात आहे. तर स्थानिक दत्त चौकात स्वस्तिक पाईप इंडस्ट्रीज या नावाने दुकान आहे. दरम्यान, तक्रारदार यांनी इंडिया मार्ट वेबसाईटवर पीव्हीसी रेझीनसाठी चौकशी टाकली होती.
त्यावरून अहमदाबाद येथील मरुधर इंटरनॅशनल मधील आकाश वाकोडे यांनी संपर्क साधून पीव्हीसी रेझीनचे मटेरियल उपलब्ध करून देण्यास संमत्ती दर्शवली होती. दरम्यान, वाहन संबंधित पत्त्यावर पाठविले. त्याच दिवशी ट्रकमध्ये माल लोड केला. आणि त्याचे फोटो व्हॉट्सअॅपवर पाठविले. त्यामुळे राजेश पतीरा यांनी आकाश वाकोड याच्या खात्यावर नेट बँकीच्या माध्यमातून बारा लाख एक हजार रूपये आरटीजीएस केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.