आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक:रोजगाराच्या नावावर महिलांची फसवणूक; प्रत्येकी महिलेकडून 20 हजार रूपये घेतले

यवतमाळ16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

फॅन्सी बटण बनवण्याची मशीन आणि कच्चा माल पुरवून रोजगार उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली शेकडो निराधार महिलांची लाखों रुपयांनी फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी यवतमाळमधील लोहारा परिसरातील महिलांनी, दि. १५ जूनला जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात धडक देत याबाबत तक्रार दिली आहे.

या प्रकरणी प्राप्त माहितीनूसार, पुणे येथील राधाकृष्ण सेल्स कॉर्पोरेशन महिला स्वयंरोजगार कंपनीने यवतमाळ जिल्ह्यातील चार महिलेच्या माध्यमातून महिलांची साखळी करीत लाखो रुपये लाटले. फसवणूक केल्यामुळे चार महिलांनी कंपनीची एजन्सी देतो, असे आमिष दाखविले. सुरुवातीला प्रत्येकी २० हजार रूपये घेवून त्या बदल्यात फॅन्सी बटण बनवण्याची मशीन आणि कच्चा माल दिला जाईल, असेही सांगण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर जिल्ह्यात शेकडो महिलांची साखळी तयार करण्यात आली.

या महिलांनाही मशीन आणि काही दिवस कच्च्या मालाचा पुरवठा केला. मात्र, नंतर हळूहळू तो बंद केला. तसेच कामाचे पैसेही दिले नाही. त्यामुळे या महिलांनी पैश्याची मागणी केली असता, पैसे देण्यास टाळाटाळ करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...