आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमरावती येथील माळी समाज बहुउद्देशीय संस्था आणि महारुद्रा सामाजिक व बहुउद्देशीय संस्थेच्या संयुक्त सहकार्याने ११ वा युवक-युवती राज्यस्तरीय परीचय मेळावा नुकताच संगीतसूर्य केशवराव भोसले सभागृह, वि. म. वि. रोड, अमरावती येथे पार पडला. या मेळाव्यात चिचमलकर दाम्पत्याचा त्यांनी केलेल्या विशेष शैक्षणिक आणि सामाजिक कार्याबद्दल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देवून त्यांचा सत्कार केला.
या प्रसंगी माळी समाज बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी ॲड. श्रीकांत नागरिकर, मनोज उपरीकर, दिनेश भुसारी, डॉ. प्रकाश कणेर, दीपक वैराळे तसेच प्रमुख अतिथी रमेशपंत काटोलकर, जनार्दन बोळे, घनश्याम बारस्कर, सागर बनकर, जिल्हा न्यायाधिश राजेंद्र मेहरे, शालिनी बुधे, डॉ. प्रवीण लोखंडे, श्याम गोटेफोडे, गणेश आरेकर, ओंकारराव ठाकरे, गणेश काटवले, प्रमोद लांजेवार, गोपाल चिचमलकर, मनोहर बनकर, राहुल बागडे, नानासाहेब आमले, श्रीधर देशमुख, नीलिमा पाटणकर, कविता नागरिकर, प्रमोद ढाकुलकर, संजय राऊत, विजय पाटणकर, संजय खडके, विजय उपरीकर, रमाकांत बाणेवार, अजय राऊत, अमर देशकर अादी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.