आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाले सफाई:नाले सफाईसाठी मुख्याधिकारी मडावी यांनी स्वत:हून घेतले हातात फावडे; नागरिकांकडून कौतुक, मान्सूनपूर्व कामाचा पालिका प्रशासनाकडून धडाका​​​​​​​

यवतमाळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर पालिकेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक माधुरी मडावी यांनी शहरात मान्सूनपूर्व कामाचा धडाका सुरु केला आहे. त्यात सांडपाणी वाहून नेणाऱ्या मोठ्या व मुख्य नाल्यांचे सफाई अभियान सुरू आहे. शनीमंदिर ते मच्छी पुल या नाल्याची छोटी गुजरी परिसरात शुक्रवार दि. १३ मे रोजी स्वच्छता करण्यात आली. यावेळी नाला स्वच्छ करणाऱ्या कामगारांसमवेत स्वतः मुख्याधिकारी यांनी नाल्यात उतरुन हातात फावडे घेतले. मुख्याधिकारी प्रत्यक्ष नाला साफ करीत असल्याचे पाहुन अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी स्वत: काम करीत कामगारांना निर्देश दिले. मुख्याधिकारी म्हणून त्यांच्या या समर्पित कर्तव्य निष्ठेचे जनतेकडून कौतुक केले जात आहे.

कित्येक वर्षापासून यवतमाळ शहरात साफसफाई तसेच मान्सून पूर्व कामाला सुरुवात करणे हे काम कधी झालेच नाही. त्यामुळे अनेकदा पावसाळ्यातील झडीमध्ये जिवंत नाल्याला पूर येऊन अनेकांच्या घरात पाणी घुसल्याच्या घटना यवतमाळकरांनी अनुभवल्या आहेत. याशिवाय सांडपाणी आणि काडी कचरा याशिवाय जमिनीवरील श्वापद सरपटणारे प्राणी हे देखील अनेकांच्या घरात घुसून त्यांच्यावर हल्ला करण्याच्या घटना घडल्या आहेत. सरपटणाऱ्या प्राण्यांच्या दंशामुळे अनेकांना उपचारा खाली यावे लागले तर काहींना मृत्यू पत्करावा लागला. ही माहिती मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी समजून घेतल्यानंतर त्यांनी स्वतः काही धडाडीचे निर्णय घेऊन मान्सूनपूर्व कामाला सुरुवात केली.

त्यात मारवाडी चौकातील गुप्ता चक्की चावलं नाला येथे तब्बल ४० सफाई कामगारांची टीम फावडे टोपल्यासह नाल्यात उतरून काम प्रारंभ केले. यावेळी मुख्याधिकारी स्वत: नाल्यात उतरल्या आणि त्यांनी कामगारांसह नाला सफाईचे काम सुरू केले. त्यांचे हे काम पाहुन सर्वसामान्य नागरिक अवाक झाले. मुख्याधिकारी स्वतःलाच काम करीत असल्याचे पाहून कर्मचारीदेखील कामाला लागले. कदाचित अधिकाऱ्यांनी स्वतः थांबून काम करून घेणे आणि स्वतः काम करणे ही पहिली घटना असावी अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य जनतेकडून व्यक्त होत आहे.

आपल्या कार्यपद्धतीमुळे लोकप्रियता मिळवणाऱ्या मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी यवतमाळ नगर परिषद प्रशासनात नवचेतना निर्माण करुन प्रत्येक कामात त्या जातीने लक्ष देतात व प्रत्यक्ष सहभागी होतात. त्यांची ही कार्यपद्धती कामगार व कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करते, अशी प्रतिक्रिया यावेळी व्यक्त केली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...