आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण गुरुवार, १३ एप्रिलला सायंकाळी साडेचार वाजता संवाद साधणार आहेत.यावेळी मुख्यमंत्री सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत वितरीत करण्यात येणाऱ्या शिधाजिन्नसांचे वितरण पात्र लाभार्थींना होत आहे किंवा कसे, याबाबत लाभार्थींच्या प्रतिक्रिया जाणून घेतील. त्याचबरोबर रास्त भाव दुकानांमार्फत योजनेचा लाभ घेताना अडचणी, समस्या येत असल्यास त्या जाणून घेतील.
''आनंदाचा शिधा'' संचाचे वितरण, राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर राशी (बोनस) तसेच शिव भोजन थाळी या योजनांचीही यात समावेश असणार आहे. या योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांपैकी प्रत्येक जिल्ह्यातील सुमारे ५० लाभार्थी संबंधित एनआयसीच्या व्हिडिओ कॉन्फरन्स केंद्रात संवादासाठी उपस्थित राहणार आहेत, असे जिल्हा पुरवठा अधिकारी एस. बी. पवार यांनी कळवले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.