आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी दि. ३ जानेवारीला जिल्हा परिषद चिखली शाळेत महिला मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याचे उद्घाटन शाळा समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पिसे यांच्या हस्ते झाले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा माजी जिल्हा परिषद सदस्या स्वाती येंडे ह्या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून केंद्र प्रमुख राजु परमार, सरपंच योगिता ठाकरे. अँड प्रदिप वानखडे, माजी उपसभापती रमेश इंगोले, पसरपंच प्रविणा भवरे, पोलिस पाटील नूतन बुटले, उपस्थित होते. सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक रमेश खरतडे यांनी केले. या प्रसंगी स्वाती येंडे यांनी महिलांना अनमोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचलन विज्ञान शिक्षक राम पाटील यांनी केले आभार प्रदर्शन शिक्षक बंडू ससाने यांनी मानले. यावेळी कोरोनावर आधारित जबरदस्त नृत्याचे सादरीकरण करण्यात आले या नृत्याला, शिक्षिका वर्षा राजगडे, चंदा दाडे आणि मंगला धबाले यांनी दिग्दर्शन केले.
महिला मेळाव्याला मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. या प्रसंगी पुष्पा बुटले, कुसुम बुटले संरक्षण अधिकारी गौतम शिवणकर, तसेच उपसरक्षनाधिकारी, निलेश प्रघाने , अंगणवाडी सेविका वैशाली भरणे ,स्वाती बुटले, रत्नकला फोपसे दिगंबर देमगुंडे, संजय जयस्वाल, रेखा गुळसुंदरे, मदतनीस, वृंदा बुटले आणि बचत गटाच्या प्रमुख महिला असंख्य संख्येने उपस्थित होत्या. संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक विनोद शिंदे, संजय गिलबिले, विनोद दुधे व राहुल पारधी यांनी परिश्रम घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.