आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घटना:नदीपात्रात आढळलेल्या बालकाचा वीज पडून मृत्यू ; आर्णी शहरातील बहिरम नगर येथील घटना

आर्णीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील बहिरम नगर परिसरात राहणाऱ्या एका १३ वर्षीय बालकाचा मृतदेह अरुणावती नदीपात्रात आढळून आला. बुधवारी, १ जून रोजी सकाळी ६ वाजताच्या दरम्यान उघडकीस आलेल्या या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली होती. त्याचा मृत्यू वीज पडून झाल्याची नोंद पोलिस ठाण्यात घेण्यात आली आहे. कृष्णा गणेश गिलबिले वय १३ वर्षे रा. बहीरम नगर असे मृत बालकाचे नाव असल्याचे तपासादरम्यान उघडकीस आले. कृष्णा हा मंगळवार, ३१ मे ला रात्री ७.३० वाजताच्या दरम्यान आर्णी येथील हैदरी बंगल्या जवळील अरुणावती नदी पात्राजवळ शौचास गेला होता. तेव्हापासुन तो घरी न आल्याने त्याचा सर्वत्र शोध सुरु होता. अशात बुधवार, दि. एक जून रोजी सकाळी अरुणावती नदीपात्रात मृतदेह आढळून आला. तो मृतदेह नेमका कुणाचा याचा शोध घेण्यात आला. दरम्यान, तो मृतदेह कृष्णा गिलबिले या १३ वर्षीय मुलाचा असल्याचे निष्पन्न झाले. या घटनेची माहीती मिळताच आर्णी पोलिस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह नदी पात्रातुन बाहेर काढला. पोलिस घटना स्थळाचा पंचनामा करीत असतांना तो बालक जीवीत असल्याची शंका निर्माण झाली होती. त्यामुळे त्याला लगेच आर्णी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी तपासणी केली असता सदर बालकाला मृत घोषित करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...