आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनजागृती:कापरा पारधी बेड्यावर बालविवाह; लैंगिक शोषणाविषयी जनजागृती

यवतमाळ20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कापरा येथील पारधी बेडा दुर्गम भागात वसलेले येथील संपूर्ण कुटुंब पारधी समुदायाचे पूर्वापार चालत आलेल्या साधनातून उपजीविका करत असलेल्या वस्तीवर उमेद अभियान पं. स. यवतमाळ द्वारे महिला व बाल विकास विभाग जिल्हा बाल संरक्षण कक्ष व आशा दीप सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा बाल संरक्षण कक्षच्या, संरक्षण अधिकारी माधुरी पावडे यांनी गावातील किशोरवयीन बालिका व महिला यांच्या सोबत बालविवाह सामाजिक समस्या, त्याचे दुष्परिणाम व बाल विवाह होऊ नये म्हणून काय करता येईल याबाबत मार्गदर्शन केले. बालकाचे लैंगिक शोषण विषयी अनेक पैलू त्यांनी उलघडले. तसेच मासिक पाळी व स्वच्छता विषयी माहिती त्यांनी दिली. २८ मे रोजी मासिक पाळी स्वच्छता दिन म्हणून साजरा करण्यात करण्यात आला त्यानिमित्ताने आदित्य बिरला एज्युकेशन ट्रस्ट- मुंबई यांच्या सहयोगाने आशादिप सामाजिक संस्था यांनी महिला व किशोरवयीन बालिका यांना सॅनिटरी पॅडचे मोफत वाटप केले.

उमेद अभियानाच्या जिल्हा व्यवस्थापक स्नेहा खडसे यांच्या द्वारे बचत गटांना लेखा नोंद वहीचे वाटप करण्यात आले तसेच बचतीचे महत्व व बचत गटाचे सामर्थ्य याविषयी त्यांनी संवाद साधला. सदर कार्यक्रम जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ज्योती कडू व उमेद अभियानच्या जिल्हा व्यवस्थापक स्नेहा खडसे यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आला व या कार्यक्रमाकरीता उमेद अभियानचे शैलेश भैसारे, तालुका व्यवस्थापक प्रशांत चावरे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर, सामाजिक कार्यकर्त्या वनिता शिरफुले हे उपस्थित होते. त्यांनी महिलांशी व किशोरवयीन बालिकांशी संवाद साधला. यावेळी गावातील बचत गटातील महिला प्रामुख्याने उपस्थित होत्या, आमच्या गावात बालविवाह होऊ देणार नाही असा निर्धार यावेळी महिलांनी केला.

बातम्या आणखी आहेत...