आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:चिमुकलीवरील अत्याचाराचा खटला जलद न्यायालयात चालवा; तहसीलदारांना निवेदन

आर्णी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चॉकलेटचे आमिष दाखवून एका सात वर्षीय चिमुकली वर चोवीस वर्षीय नराधम युवकाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना आर्णी तालुक्यात रविवारला उघडकीस आली होती. चिमुकली वर अत्याचार करण्याऱ्या त्या आरोपीविरुद्ध खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवा, अश्या मागणीचे निवेदन बुधवार दि. १६ मार्च रोजी आर्णी राष्ट्रवादी युवती काँग्रेसतर्फे तहसीलदार परशुराम भोसले यांच्यामार्फत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पाठवण्यात आले आहे.

आर्णी तालुक्यातील सात वर्षाच्या चिमुकली वर अत्याचार केल्याची घटना ही मानव जातीला काळिमा फासवणाऱ्या घटनेची गांभीर्याने दखल घ्यावी, जेणेकरून समाजातील वाईट प्रवृत्तीला आळा बसेल. सदर पिडीत मुलीला न्याय मिळून देण्यासाठी व झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवती तालुकाध्यक्ष अश्विनी देशमुख यांनी त्या नराधम आरोपीचा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अश्या मागणीचे निवेदन गृहमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.

यावेळी महिला आघाडी जिल्हा सरचिटणीस रंजना आडे, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष युनूस शेख, सोनू जाधव, सुरेखा जाधव, परवेज बेग यांच्यासह पीडिताचे नातेवाईक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...