आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आकस्मित निधन:नऊ महिन्यांच्या मुलीसह आईने लावला गळफास, साडीचा फास सैल झाल्याने चिमुकली बचावली

मारेगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मारेगाव तालुक्यातील मार्डी येथील एका महिलेने आपल्या ९ महिन्यांच्या चिमुकलीसह साडीचा गळफास घेऊन आत्महत्येच्या प्रयत्नात महिलेचा मृत्यू झाला, मात्र सुदैवाने फास सैल झाल्याने यात चिमुकलीचे प्राण वाचले. ही घटना मार्डी येथे मंगळवार, दि. ७ जूनला सकाळी उघडकीस आली. रोशनी आशिष झाडे वय २४ वर्ष असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. तर बाळावर सध्या वणीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. या प्रकरणी प्राप्त माहितीनूसार, मार्डी येथील वैद्य यांची एकुलती एक मुलगी रोशनी हिचे काही वर्षांपूर्वी हिंगणघाट तालुक्यातील शेकापूर येथील आशिष झाडे यांच्याशी विवाह झाला होता. त्या दरम्यान त्यांना ऐक गोंडस मुलीला जन्म दिला. त्यानंतर असाच यांचा सुखाने संसार सुरु असताना मागील दोन महिन्यापूर्वी आशिष झाडे यांचा आकस्मित मृत्यू झाला. त्यामुळे ती मार्डी येथे माहेरी आली होती. मंगळवारी दि. ७ जूनला रोशनी हिचे वडील हे कामानिमित्त बाहेर गेले होते. तर आई घराबाहेर होती. हे बघून रोशनीने सकाळी ६ ते ७ वाजताच्या सुमारास तिच्या ९ महिन्याच्या बाळाला घेऊन घरातील पंख्याला साडीने गळफास घेत आत्महत्या केली. काही वेळाने ही घटना उघडकीस आली. यात रोशनीचा मृत्यू झाला होता. अवघ्या दोन महिन्याच्या कालावधीत आई व वडिलांचे छत्र हरवल्याने ९ महिन्यांची चिमुकली पोरकी झाली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. रोशनीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मारेगाव येथे आणण्यात आला. मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट असून घटनेचा तपास मारेगाव पोलिस करीत आहे.

बातम्या आणखी आहेत...