आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:पैनगंगा अभयारण्यात चितळाची शिकार; मराठवाड्यातील तिघे वन विभागाच्या ताब्यात

उमरखेड2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उमरखेड तालुक्यातील पैनगंगा अभयारण्यातील खरबी वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या वडगाव नियत क्षेत्रात चितळाची शिकार करणाऱ्या तिघांना वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी चितळाच्या अवयवासह ताब्यात घेतले आहे. बाबू हनुमानदास, मारोती आरमाळकर आणि मारोती मेंडके अशी त्या तिघांची नावे असून ते किनवट तालुक्यातील कोठारी येथील आहे.

सेंट मेरी स्कुलच्यामागे चितळाची शिकार झाल्याची गोपनीय माहिती मिळाली. अवैध शिकार करून चितळ वडगाव नियत क्षेत्राला लागून असलेल्या कोठारी ( चि) येथे दि. १९ जूनला कळाले. त्यावरून वन्यजीव विभागाच्या पथकाने खातरजमा करून त्याच रात्री १० वाजण्याच्या सुमारास कोठारी येथील बाबू हनुमान दास यांच्या गावठी डुकराच्या फार्म हाऊसवर ट्रॅप लावला. दरम्यान वन कर्मचाऱ्यांनी सोमवारी सकाळी बाबू हनुमान दास या मुख्य आरोपीला चितळाच्या अवयवासह रंगेहाथ पकडले. यावेळी दुसरा आरोपी मारोती आरमाळकर याच्यासह जाळे मारोती मेंडके या आरोपीचे असल्याने त्याला ताब्यात घेतले.

बातम्या आणखी आहेत...