आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यात एकाच दिवसात आढळले 5 पॉझिटिव्ह‎:नागरिकांनो सावधान,‎ कोरोना पुन्हा परततोय‎

यवतमाळ‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाची‎ रुग्णसंख्या कमी झाली असतानाच‎ आता अचानक कोरोनाचे रुग्ण वाढु‎ लागले आहे. त्यातच शुक्रवार दि. ७‎ एप्रिल रोजी एकाच दिवसात‎ जिल्ह्यात ५ नवे कोरोना पॉझिटिव्ह‎ रुग्ण आढळुन आले. त्यामुळे‎ जिल्ह्यात सध्या असलेल्या‎ अॅक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या‎ आता १८ झाली आहे. जिल्ह्यात‎ वाढत असलेले कोरोनाचे रुग्ण‎ पाहता नागरिकांनो सावधान,‎ कोरोना पुन्हा परततोय असे‎ म्हणण्याची वेळ आली आहे.‎ दिवाळीपासुन कोरोनाची‎ रुग्णसंख्या कमी होत असताना‎ काही महिन्यांपासून रुग्ण आढळुन‎ येण्याचे बंद झाले होते.

मात्र, गेल्या‎ महिन्यापासून सर्दी, खोकला, ताप,‎ श्वास घेण्यास त्रास असलेल्यांची‎ संख्या वाढु लागली. अशातच‎ मंगळवार, दि. ४ एप्रिल रोजी एकाच‎ दिवशी १० रुग्ण पॉझिटिव्ह आले‎ होते. त्यानंतर आता ७ एप्रिल रोजी‎ आनखी ५ नवे पॉझिटिव्ह रुग्ण‎ आढळुन आले आहेत. या‎ दिवसभरात ४३३ कोरोना तपासण्या‎ करण्यात आल्या. त्यात ५ जण‎ पॉझिटिव्ह आले असुन ४२८ जण‎ निगेटिव्ह आहेत. पॉझिटीव्ह‎ आलेल्यांमध्ये ३ महिला तर २‎ पुरुषांचा समावेश आहे. त्यात‎ यवतमाळ शहरातील ४ जणांचा‎ आणि दुसऱ्या जिल्ह्यातील एकाचा‎ समावेश आहे.

सध्या जिल्ह्यात‎ अॅक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या‎ १८ झाली असुन त्यापैकी २ जण घरी‎ उपचार घेत असुन उर्वरीत‎ रुग्णालयात दाखल आहेत.‎ ‎ त्रिसुत्रीचे पालन करण्याचे‎ आवाहन‎ कोरोना रुग्ण वाढीच्या अनुषंगाने‎ जिल्हास्तरीय टास्क फोर्स समिती‎ परिस्थितीवर लक्ष ठेऊन असल्याचे‎ प्रशासनाकडून सांगण्यात आले‎ आहे. सध्यातरी नागरिकांनी‎ कोविड-१९ च्या त्रिसुत्रीचे पालन‎ करुन प्रशासनाला सहकार्य करावे,‎ असे आवाहन जिल्हाधिकारी‎ अमोल येडगे यांनी केले. यासंदर्भात‎ येत्या दोन ते तीन दिवसांत राज्य‎ स्तरावरच व्हिडीओ कॉन्फरन्स‎ होण्याची शक्यता आरोग्य विभागाने‎ वर्तवली आहे.‎