आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यक्त केला रोष:नागरिकांनी रोखली ‘मजिप्रा’च्या कार्यकारी अभियंत्यांची गाडी ; माजी नगरसेवकांचाही समावेश

यवतमाळ24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरतील अनेक प्रभागात पंधरा दिवसानंतर पाणीपुरवठा होत आहे. यामुळे संपूर्ण प्रभागातील नागरिक त्रस्त व व्याकूळ झाले आहे. याकरीता गुरूवार, दि. ९ जून रोजी संतप्त नागरिकांसह माजी नगरसेवकांनी ‘मजिप्रा’च्या कार्यकारी अभियंता प्रफुल्ल व्यवहारे यांची गाडी रोखून घेराव घातला. दरम्यान शहरातील विस्कळीत झालेला पाणीपुरवठा नियमीत करण्याची मागणी केली. शहरातील प्रभाग क्रमांक एक तलाव फैल, मधुबन सोसायटी, केशव पार्क, नारिंगे नगर, कमला पार्क, सुरेश नगर, गिरिजा नगर, चांदोरे नगर, मोहा, प्रभाग क्रमांक तीन मधील पिंपळगाव, विठ्ठलवाडी, वंजारी फैल, प्रभाग क्रमांक पाच मधील बांगर नगर, गिरी नगर, आदर्श सोसायटी, गाडगे नगर, प्रभाग क्रमांक सहा वंजारी फैल, कामगार नगर, गाडगे नगर, राजेंद्र नगर, तसेच प्रभाग क्रमांक सात गांधीनगर गोदाम फैल, तलाव फैल पावर हाऊस आदी भागात पाणीपुरवठा नियमीत होत नाही. मागील १२ ते १५ दिवसांपासून जीवन प्राधिकरणातर्फे पाणीपुरवठा करण्यात आलं नाही. यामुळे या संपूर्ण भागातील नागरिक त्रस्त व व्याकूळ झाले आहे. विविध पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक तसेच संतप्त नागरिकांसह गुरुवारी जाब विचारणार करिता जीवन प्राधिकरण येते धडक दिली. जीवन प्राधिकरणाचे अधिकारी व्यवहारे व कवठाळकर यांची गाडी अडवून घेराव घातला. पाणी समस्या तात्काळ निकाली काढावी याची मागणी केली. अधिकार्‍यांनी महावितरण योग्य प्रमाणात विद्युत पुरवठा करीत नसल्याची सबब सांगितली. वीजपुरवठा सुरळीत झाल्यास पाणी देऊ असे आश्वासन त्यांनी दिले. समाधान न झाल्याने सदर अधिकारी यांना सोबत घेऊन महावितरण कार्यालय लोहारा येथे धडक दिली. याठिकाणी महावितरणचे अधीक्षक अभियंता मडावी यांना याबाबत विचारणा केली. त्यांनी विद्युत पुरवठा आम्ही येत्या पाच ते सात दिवसात सुरळीत करू असे आश्वासन दिले. यामुळे आता सदर भागामध्ये पुढील दोन-तीन दिवस सुद्धा पाणी येण्याची कोणतीही शक्यता नाही. पाणी पुरवठा अधिकारी यांना पुन्हा गाठून काही व्यवस्था करून सदर पाणी दोन-तीन दिवसात द्यावे अशी मागणी केली. यावर त्यांनी प्रयत्न करून दोन-तीन दिवसात पाणी समस्या निकाल काढू असे आश्वासन दिले. यावेळी माजी नगरसेवक विजय खडसे, शिवसेना जिल्हाप्रमुख पराग पिंगळे, उपजिल्हाप्रमुख किशोर इंगळे, तालुका प्रमुख संजय रंगे, चालक-मालक संघटनेचे रूपेश सरडे, छोटू सवाई, गजानन इंगोले, सचिन बारस्कर, उद्धवराव साबळे, राजेश राऊत, राहुल गंभीरे, साधना काळे, भाजप उपाध्यक्ष श्रीकृष्ण कांबळे, कार्तिक ताजणे, जयदीप सानप, देविदास अराठे, अश्विन बोपचे, शुभम चोरमले, प्रदीप राऊत, किशोर पवार, चंद्रशेखर पवार, गोपाल सरदार आदी नागरिक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...