आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक:पॉलिसी लॅप्स झाल्याचे सांगत पावणे दोन लाखाने फसवणूक

यवतमाळ8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विमा पॉलिसी लॅप्स झाल्याचे सांगत एका तरुणाची चौघांची पावणे दोन लाखाने फसवणूक केली. ही घटना चार महिन्यापूर्वी शहरातील साई मंदिर परिसरात घडी असून या प्रकरणी शुक्रवार, दि. १८ नोव्हेंबरला अवधुतवाडी पोलिस ठाण्यात चौघांवर गुन्हे नोंद करण्यात आले आहे. आदर्श अग्रवाल, रोहित जैन, आनंद पांडे आणि त्रिपाठी अशी फसवणूक करणाऱ्या चौघांची नावे आहे.

या प्रकरणी अमोल वारनुरकर वय ३५ वर्ष रा. साई मंदिर परिसर, यवतमाळ यांनी अवधुतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीनूसार, सन २०१४ मध्ये अमोल वारनुरकर याने मॅक्स लाईफ विमा पॉलिसी काढली होती. मात्र काही काळानंतर ती पॉलिसी लॅप्स झाली. त्यानंतर दि. १ मे रोजी एका मोबाईल क्रमांकावरून अमोल याला एक कॉल आला.

यावेळी आदर्श अग्रवाल नामक व्यक्तीने अमोल याने काढलेली पॉलिसीचा परतावा आमच्या कंपनीकडे आला असल्याचे सांगितले. तसेच ८ लाख ६२ हजार ४११ रूपये बनत असल्याचेही सांगितले. त्यानंतर अमोल याला नॉमिनी आणि संपूर्ण माहिती सांगितली. त्यामूळे अमोल याला त्या व्यक्तीवर विश्वास बसला. दरम्यान पॉलिसी लॅप्स झाल्यामुळे काही चार्जेस घ्यावे लागतील, असे म्हणत कॉल कट केला. त्यानंतर पुन्हा दोन दिवसानंतर कॉल करीत ६० हजार रूपये भरावे लागेल असे सांगितले. यावेळी त्या व्यक्तीने एचडीएफसी बँक खाते क्रमांक पाठविला.

पॉलिसीचे पैसे मिळून देण्याच्या नावाखाली त्या खात्यात पैसे टाकण्यास भाग पाडले. दरम्यान अमोल याने त्या व्यक्तीला कॉल केला मात्र संपर्क होवू शकला नाही. त्यावेळी आपली फसवणूक झाल्याचे अमोल याच्या लक्षात आले. या प्रकरणी अमोल याने पोलिस ठाण्यात चौघांविरोधात तक्रार देत १ लाख ८५ हजार ९६० रूपयाने फसवणूक केल्याची तक्रार दिली. त्यावरून चौघांवर गुन्हे नोंद करण्यात आले

पोलिस असल्याची बतावनी, वृद्धाची फसवणूक
यवतमाळ शहरातील चापमनवाडी परिसरात पोलिस असल्याचे सांगून एका वृद्धाची सोन्याची चैन आणि दोन अंगठ्या असा ९० हजार रूपयांचा ऐवज लंपास करीत फसवणूक करण्यात आली. ही घटना शुक्रवार, दि. १८ नोव्हेंबरला पोलिस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी जीवनलाल जयस्वाल वय ७० वर्ष रा. सारस्वत ले-आऊट यांनी दिलेल्या तक्रारीवरून अवधुतवाडी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद केला आहे.

बातम्या आणखी आहेत...