आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा नोंद:घर आणि जमिनीच्या वादातून एकाच‎ कुटुंबातील सदस्यांमध्ये आपसात हाणामारी‎

यवतमाळ‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

घर आणि जमिनीच्या हिस्से‎ वाटणीवरून एकाच कुटुंबीयांतील‎ सदस्यांमध्ये आपसात हाणामारी‎ झाली. ही घटना शहरातील वंजारी‎ फैल परिसरात शनिवार, ४ मार्चला‎ सायंकाळच्या सुमारास घडली. या‎ प्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून‎ शहर पोलिसांनी सात जणांवर विविध‎ कलमान्वये गुन्हे नोंदवून पाच जणांना‎ अटक केली आहे.‎ या प्रकरणी दिनेश पुंडलिक ठाकरे‎ (४५) रा. वंजारी फैल यांनी दिलेल्या‎ तक्रारीवरून पोलिसांनी गणेश ठाकरे‎ (६०), कुणाल ठाकरे (२३), सचिन‎ ठाकरे (२५), किसन राऊत (४४)‎ सर्व रा. बुटले ले-आऊट पिंपळगाव‎ आदींवर गुन्हे नोंद केले आहे.

तर‎ गणेश पुंडलिक ठाकरे वय ६० वर्ष‎ यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी‎ दिनेश ठाकरे वय ४० वर्ष, विलास‎ राऊत (२८) आणि आकाश मैंद‎ (२८) सर्व रा. वंजारी फैल, यवतमाळ‎ याच्या विरोधात गुन्हे नोंद केले आहे.‎ पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या‎ माहितीनूसार, शहरातील वंजारी फैल‎ येथे शनिवारी सायंकाळी दिनेश ठाकरे‎ आणि गणेश ठाकरे यांच्या‎ कुटुंबीयांमध्ये शेती आणि जमिनीच्या‎ हिस्से वाटणीवरून वाद निर्माण झाला.‎ त्यानंतर वादाचे रुपांतर हाणामारीत‎ झाले. यात दोन्ही गटातील सदस्य‎ गंभीर जखमी झाले होते. घटनेची‎ माहिती मिळताच शहर पोलिसांनी‎ धाव घेऊन जखमींना शासकीय‎ रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.‎ या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून‎ सात जणांवर गुन्हा नोंदवला आहे.‎

बातम्या आणखी आहेत...