आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाद‎:लोहार लाईनमध्ये‎ रंगपंचमीच्या दिवशी हाणामारी‎ ; विविध कलमान्वये गुन्हे दाखल

पुसद‎20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील लोहार लाईनमध्ये रंगपंचमीच्या दिवशी‎ दहीहंडी फोडताना धक्का लागल्याच्या कारणावरून वाद‎ निर्माण झाला होता. त्यानंतर लोहार लाईनमध्ये राहणाऱ्या‎ सहा जणांनी संगनमत करून युवकाला बेदम मारहाण‎ केल्याची घटना घडली होती. सहा जणांविरोधात शहर‎ पोलिस ठाण्यामध्ये दि. ९ मार्चला रात्री ९.५८ वाजता‎ विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.‎ दोन दिवसांपूर्वीच मुकेश यांनी किरकोळ कारणावरून‎ मारहाण झाल्याप्रकरणी तक्रार दिली असता गुन्हे दाखल‎ झाले होते.‎ अजय संजय पोंगाडे वय २४ वर्ष असे तक्रारदार‎ युवकाचे नाव आहे. त्याने दिलेल्या तक्रारीवरून लोहार‎ लाईनमध्ये राहणाऱ्या दिग्विजय मुकेश वय २१ वर्ष व‎ त्याच्या पाच साथीदारां विरोधात गुन्हे दाखल करण्यात‎ आले आहे.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या‎ माहितीनुसार, दि. ७ मार्चला संध्याकाळी वाजताच्या‎ दरम्यान लाईनमध्ये युवकांनी दहीहंडी फोडण्याचा‎ कार्यक्रम आयोजित केला होता. दहीहंडीच्या‎ कार्यक्रमांमध्ये युवक जणांसोबत अजय नाचत असताना‎ दिग्विजयला धक्का लागल्याच्या कारणावरून वाद‎ निर्माण झाला. त्यानंतर सहा आरोपींनी संगनमत करून‎ अजय याच्या बुलेटचे लोखंडी सायलेन्सर डोक्यात‎ मारून गंभीर जखमी केले व शिवीगाळ करीत जीवाने‎ ठार मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणाचा‎ अधिक तपास शहर पोलिस करीत आहे.‎

बातम्या आणखी आहेत...