आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Amravati
  • Yavatmal
  • Class Of Officers To Be Taken By The Commission For Scheduled Castes And Scheduled Tribes; Review In Zilla Parishad On Thursday, Instructions For Officers To Be Present |marathi News

यवतमाळ:अनुसूचित जाती, जमाती आयोग घेणार अधिकाऱ्यांचा क्लास; गुरुवारी जिल्हा परिषदेत आढावा, अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना

यवतमाळ4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील लाभार्थींच्या विविध वैयक्तिक योजनांसह आस्थापना विषयक बाबींचा आढावा घेण्याकरिता महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या अध्यक्षांसह अधिकारी जिल्ह्यात बुधवार, ६ एप्रिल रोजी धडक देणार आहेत. दरम्यान, गुरुवार, ७ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा परिषदेच्या सभागृहात अधिकाऱ्यांचा आढावा घेतल्या जाणार आहे. यात बनावट जात प्रमाणपत्रांसह पदोन्नती तसेच इतरही प्रकरणे समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात आली. ही माहिती गोळा करण्याच्या दृष्टीने प्रशासन कामाला लागले आहे.

जिल्हा परिषद समाजकल्याण विभाग, विशेष समाजकल्याण विभाग, आदिवासी प्रकल्प कार्यालयांसह कृषी विभागाच्या माध्यमातून अनुसूचित जाती व जमातीतील लाभार्थ्यांसाठी अनेक योजना राबवण्यात येतात. वैयक्तिक लाभाच्या योजनांचा यामध्ये मोठ्या प्रमाणात समावेश आहे, परंतू बऱ्याच वेळा या योजनांची अंमलबजावणी प्रभावीरीत्या केली जात नाही. परिणामी, अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील लाभार्थी योजनांपासून वंचित राहत आहेत. अशा परिस्थितीत लाभार्थींकडून मोठ्या प्रमाणात ओरड होते. विशेष म्हणजे काही विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारावर नोकऱ्या बळकावल्या आहेत. यासंदर्भात वारंवार तक्रारी करण्यात आल्या आहेत. न्यायालयानेसुद्धा बोगस जात प्रमाणपत्र बळकावणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत आदेशित केले आहे. तरीही कुठल्याही स्वरूपाची कारवाई केली जात नाही. त्यामुळे अनेक होतकरू नोकरीपासून वंचित राहत आहेत. या प्रकरणाची दखल आता महाराष्ट्र अनुसूचित जाती व जमाती आयोग घेणार आहे.

ही समिती बुधवार, ५ एप्रिल रोजी रात्री येणार आहे. तर ६ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा परिषदेच्या सभागृहात आढावा बैठक घेणार आहे. या समितीचे अध्यक्ष ज. मो. अभ्यंकर आहेत. त्यांच्यासोबत महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे सचिव शशांक बर्वे, सदस्य आर. डी. शिंदे, के. आर. मेढे, रमेश शिंदे, आदी उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधीक्षक, सामाजकल्याण प्रादेशिक उपायुक्त, समाजकल्याण सहायक आयुक्त आदींना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यवतमाळ येथे आढावा बैठक घेतल्यानंतर अनुसूचित जाती, जमाती आयोगाची समिती चंद्रपूर जिल्ह्याकडे रवाना होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...