आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गैरप्रकार थांबवण्याची मागणी:यार्डात व्यापाऱ्यांनी केलेले अतिक्रमण हटवा

पुसद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कृषी उत्पन्न बाजार समितीमधील गैरप्रकार थांबवण्याची मागणी दि. १७ ऑगस्टला यवतमाळच्या जिल्हा उपनिबंधकाकडे निवेदनातून करण्यात आली आहे. शेतकरी बांधवांच्या विविध मागण्यासाठी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे शहर अध्यक्ष गजानन हिंगमिरे यांनी त्वरित कार्यवाहीची मागणी केली असून अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा देखील दिला आहे.

पुसदच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये व्यापाऱ्यांनी त्यांची खाजगी मालमत्ता समजुन गाळे वाटप करुन घेतले आहेत. ते त्वरीत खाली करुन शेतकऱ्यांस माल टाकण्यास उपलब्ध करुन देण्यात यावे, शेतकऱ्यांचा माल उघड्यावर टाकण्यात येत असल्यामुळे पावसाचे पाणी पडल्यास अनेक वेळा माल भिजल्याचा प्रकार झाला आहे आणि होतही आहे. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. राशनचा माल मार्केट यार्डमध्ये गैरमार्गाने येवून त्याला प्रमाणपत्र देवुन विकला जात आहे. संबंधित व्यापाऱ्याने तो गहु कोणत्या शेतकऱ्यांकडून खरेदी केला आहे याची माहिती जाहीर करावी, असे निवेदनातून मागणी केली आहे.

मार्केट यार्ड हे शेतकऱ्यांच्या मालाची देवाण घेवाण करण्याकरीता आहे. परंतू पुसदमध्ये व्यापाऱ्यांनी मार्केट यार्डमध्ये आपले दुकान थाटले असुन ते त्वरीत बंद करण्यात यावे, बाजार समितीत शेतकऱ्यांसाठी कोणत्याही सोई सुविधा उपलब्ध नाही. संबंधित कर्मचाऱ्यांची संपर्क केला असता उडवा उडवीचे उत्तरे मिळतात. यार्डमध्ये लाखो रुपये खर्च करुन सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. परंतु यार्डमधील कुकर्म लपवण्यासाठी ते नादुरुस्त करण्यात आले आहेत. या मागण्यासाठी निवेदन दाखल करण्यात आले आहे. निवेदनाची तात्काळ दखल न घेतल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल असा इशारा सुद्धा दिला आहे.निवेदन देतेवेळी किसान मोर्चा शहराध्यक्ष गजानन हिंगमीरे, दीपक सिंह परिहार, डॉ.रुपाली जयस्वाल, विश्वजीत सरनाईक, राजू जगताप, नटवरलाल उंटवाल,सनी देशमुख, माधवराव बरगाडे चंद्रकांत कांबळे, माधव भांगे, संतोष मुकेश, अमोल पैठणकर, चंद्रकांत घाटोडकर, हेमंत आंबोरे, सुरज पैठणकर पूजा पावडे, सुधाकर चव्हाण, विक्की कांबळे, मोहम्मद हनीफ, हरीश चौधरी यांच्यासह मोठ्या प्रमाणात भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...