आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निमंत्रण‎:करणवाडी परिसरातील बंद हायमास्ट‎ देताहेत अपघातास निमंत्रण‎

मारेगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मारेगाव करंजी महामार्गावर‎ करणवाडीजवळ हाय मास्ट लाईट बंद असल्याने‎ डिव्हायडरवर गाड्या आदळून तर कधी‎ डिव्हायडरवर गाड्या आदळून रोजच अपघात होत‎ असल्याने हा परिसर अपघात प्रवण असा‎ नावारूपास येत आहे. मारेगाव करंजी हा महामार्ग‎ करणवाडीवरून जातो. करणवाडी जवळ‎ चारचाकी वाहन धारकांना विश्रांती घेता यावी‎ यासाठी मार्ग रुंद करून दुभाजक टाकण्यात आले‎ तसेच परिसरात हायमास्ट लाईट ही लावण्यात‎ आले आहे. परंतु मार्ग निर्माण करण्यात आला.‎ तेव्हापासून काही दिवसच लाईट सुरू राहिले आता‎ हे सर्व लाईट बंद अवस्थेत आहे.

त्यामुळे वाहकांना‎ मार्गावर दुभाजक दिसून येत नाही आणि अपघात‎ घडतात. नुकताच काल लाईट बंद असल्याने‎ दुचाकीचा अपघात झाला. अपघात होणे ही आता‎ नित्याची बाब झाली आहे. हायमास्ट सुरू‎ करण्यासाठी अनेक वेळा संबंधिताना नागरिकांनी‎ फोन द्वारे सांगण्यात आले. परंतु कुठलाही परिणाम‎ झाला नाही.यावर ठोस उपाय योजना करण्याची‎ गरज आहे.‎

बातम्या आणखी आहेत...