आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांना चिंता‎:ढगाळ वातावरणाचा तुरीच्या फुलांवर‎ विपरीत परिणाम, शेतकऱ्यांना चिंता‎

मानोरा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मानोरा तालुक्यातील जवळपास निम्म्या‎ शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि तूर पिकाची पेरणी‎ केली आहे. मात्र बदललेल्या वातावरणामुळे‎ बहरलेल्या सोयाबीन आणि तुरीच्या पिकावर‎ संकटांचे ढग जमा होताहेत. परिणामी तुरीच्या‎ उत्पादनात घट येण्याची शक्यता असल्याने, पुन्हा‎ नव्या संकटामुळे शेतकरी चिंतेत आहेत.‎ तालुक्यातील बहुतांश शेतकरी हमखास येणारे पीक‎ म्हणून मागील काही वर्षांपासून सोयाबीन आणि‎ तुरीकडे वळलेले आहे. सोयाबीनचा हंगाम‎ संपल्यानंतर राहिलेल्या तुरीचे पीक सिंचनाची‎ सुविधा व यावर्षी पोषक वातावरण असल्यामुळे‎ बऱ्यापैकी आलेले आहे.

अनेक ठिकाणी तुरीच्या‎ शेंगा लागल्या असून काही ठिकाणी तूर ही फुलावर‎ आहे. यावर्षी आधीच अतिवृष्टी झाल्याने तुर‎ पिकावर त्याचा मोठा परिणाम होऊन तूर पीक‎ बाल्यावस्थेतच मोठ्या प्रमाणात जळून गेली होती.‎ अतिवृष्टीतून बचावलेली तूर आता फलधारणा‎ करीत असून मागील काही दिवसांपासून ढगाळ‎ वातावरणामुळे थंडी कमी झाली असून, त्याचा‎ परिणाम फुलोऱ्यावर आलेल्या तूर पिकावर झाला‎ असून, फुलगळ आणि किडींचा प्रादुर्भाव होत‎ असल्याने तालुक्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांमध्ये‎ चिंता पसरलेली आहे. निसर्गाचे हे दुष्टचक्र‎ निवळण्याची प्रार्थना शेतकरी करताहेत.‎

बातम्या आणखी आहेत...