आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शासकीय कामाच्या ठिकाणी अवैध वाळूचा वापर प्रकरण‎:महसूल अधिकाऱ्यांकडून दंड‎ वसूल करा; ‘प्रहार’ची मागणी‎

उमरखेड‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालूक्यात शासकीय प्रशासकीय‎ बांधकामावर अवैध वाळूचा‎ सर्रास वापर होत असून, या‎ कामांवर होणाऱ्या वाळूच्या‎ वापराची तात्काळ चौकशी करून‎ स्थानिक महसूल प्रशासनाच्या‎ अधिकारी व कर्मचारी यांच्यावर‎ कडक कारवाई करावी व‎ संबंधितांकडून दंड वसूल‎ करण्यात यावा, अन्यथा तीव्र‎ आंदोलन छेडणार असल्याचा‎ इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे‎ शहरप्रमुख राहुल मोहितवार यांनी‎ जिल्हाधिकारी यांना दिलेल्या‎ निवेदनातून दिला आहे.‎ उमरखेड शहरात तसेच‎ तालुक्यात मोठ्या प्रमाणात‎ रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामे‎ सुरू आहेत, तर अनेक गावांत‎ ‘जलजीवन मिशन’अंतर्गत‎ पाण्याच्या टाकीचे काम सुरू‎ आहेत.‎

वाळूघाट बंद असतानाही या‎ सर्व कामांसाठी उपलब्ध होणारी‎ वाळू ही कुठुन येते? याचा शोध‎ घेऊन महसूल प्रशासनाने कारवाई‎ करणे गरजेचे होते, परंतू तसे न‎ झाल्याने लाखोंचा महसूल बुडाला‎ आहे. बुडालेला हा महसूल‎ प्रशासनाच्या अधिकारी व‎ संबंधीत कर्मचाऱ्यांकडून दंड‎ स्वरूपात वसूल करून त्यांच्यावर‎ कारवाई करावी, अशी मागणी‎ ‘प्रहार’चे शहरप्रमुख राहुल‎ मोहितवार यांनी थेट‎ जिल्हाधिकारी यांच्याकडे केली‎ असून या अवैध रेतीची चौकशी‎ करावी अन्यथा ‘प्रहार’तर्फे‎ आंदोलन छेडण्याचा इशारा दिला‎ आहे.‎