आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:शेतकऱ्याकडून अव्वाच्या सव्वा रक्कम वसूल; ई सेवा संचालकांविरुद्ध कारवाई करा

मोताळा21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पी.एम. किसान योजनेच्या नोंदणीसाठी शेतकऱ्याकडून अव्वाच्या सव्वा रक्कम वसूल करणाऱ्या येथील महा ई सेवा केंद्र चालकाविरुध्द कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक सचिन हिरोळे यांनी आज ८ सप्टेंबर रोजी एका निवेदनाद्वारे तहसीलदार यांच्याकडे केली आहे.

त्यांनी दिलेल्या निवेदनानुसार, प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेची सध्या नोंदणी सुरू आहे. या नोंदणीसाठी पन्नास ते शंभर रुपये दर आकारण्यात येतात. परंतु येथील तहसील कार्यालयासमाेरील महा ई सेवा केंद्रात नोंदणी केलेल्या बहुतांश शेतकऱ्यांकडून चक्क सहाशे रुपये घेण्यात आले आहेत. यावेळी काही शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी एवढे पैसे कसे लागतात, अशी विचारणा केली असता ५७० रुपये नोंदणीसाठी चलान भरावे लागते, असे दिशाभूल करणारे उत्तर शेतकऱ्यांना दिले. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक लूट करणाऱ्या केंद्र चालकाची चौकशी करून कारवाई करण्यात यावी. तसेच शिल्लक घेतलेली रक्कम शेतकऱ्यांना परत करण्यात यावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नगर सेवक सचिन हिरोळे, पुरूषोत्तम राऊत, विकास पाटील व ज्ञानदेव राऊत यांनी दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...