आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाहीर:जिल्हाधिकारी अमोल येडगे आराखडा जाहीर ; जिल्ह्यातील 8 नगरपालिकांची अंतिम प्रभाग रचना जाहीर

यवतमाळ18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील आठ नगर पालिकांची अंतीम प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा गुरूवार दि. ९ जुन रोजी प्रसिद्ध करण्यात आला. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी हा आराखडा जाहीर करताच पालिकेच्या राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे. यानंतर येत्या १३ जुन रोजी आरक्षणाची सोडत निघणार आहे. त्यामुळे या सोडतीकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.

जिल्ह्यातील यवतमाळ, पुसद, वणी, दारव्हा, दिग्रस, घाटंजी, उमरखेड तसेच आर्णी पालिकेची मुदत संपली आहे. याठिकाणच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी तयारी सुरु झाली आहे. पुर्वीच्या कार्यक्रमानुसार पालिकेने प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली होती. मात्र, शासनाच्या आदेशानंतर ती प्रक्रीया स्थगित करण्यात आली होती. मात्र पुन्हा निवडणुकांची तयार सुरू झाली आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय या निवडणुका पार पडत आहे. त्यासाठी प्रभाग रचनेचा रखडलेला कार्यक्रम पुन्हा जाहीर करण्यात आला होता. त्यात जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेच्या आराखड्यावर सर्व ८ नगर पालिका मिळुन एकुण ८६ आक्षेप दाखल झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...