आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएक दिवस, बळीराजा सोबत’ या अभियानांतर्गत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कळंब व राळेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर भेट देवून शेतकऱ्यांना बियाण्यांचे वाटप केले तसेच त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यावर योग्य उपाययोजना करण्याचे आदेश यंत्रणेला दिले. याप्रसंगी जिल्हाधिकारी यांचे समवेत उपजिल्हाधिकारी, संगीता राठोड, राळेगावचे उपविभागीय अधिकारी शैलेश काळे, तहसीलदार सुनील चव्हाण, रवींद्र कानडे, सहायक गटविकास अधिकारी महाजन, तालुका कृषी अधिकारी भगत प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यांनी कळंब तालुक्यातील तासलोट, मेटिखेडा व डोंगरखर्डा तसेच राळेगाव तालुक्यातील सावंगी (पेरका), बुजरी व वटखेड या गावांना भेट दिली. तासलोट येथे पाणी फाउंडेशन वाटर कप अंतर्गत झालेल्या जलसंधारण कामाची त्यांनी पाहणी केली व तेथील उर्वरित क्षेत्रात जलसंधारणाची कामे मनरेगा अंतर्गत घेण्याच्या सुचना दिल्या. मेटिखेडा व बुजरी येथे आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंबातील वारसांच्या नोंदी तातडीने घेण्याचे तसेच त्यांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देण्याबाबत त्यांनी निर्देश दिले. याप्रसंगी लाभार्थींना रेशन कार्ड वाटप करण्यात आले.
जिल्हाधिकारी यांनी कळंब तहसील कार्यालय येथे सर्व तालुका विभाग प्रमुख यांची आढावा बैठक घेवून पोकरा, जलजिवन मिशन, घरकुल योजना, मातोश्री पाणंद रस्ता, पोटखराब वर्ग-अ कामकाज, कर्ज वाटप बाबत आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषद उपअभियंता मानकर, मंडळ अधिकारी, गरकल, राउत, तसेच सर्व तलाठी, मंडळ अधिकारी, कृषी अधिकारी व तालुका स्तरीय यंत्रणेचे संबंधीत अधिकारी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.