आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:भरधाव दुचाकींची धडक,‎ दोन ठार तर एक गंभीर‎

यवतमाळ22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‎दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक बसल्याने‎ दोन्ही दुचाकींवरील तिघे जण गंभीर जखमी झाले.‎ त्यातील दोघे जण काही क्षणातच जागीच ठार झाले.‎ भीषण अपघाताची ही गंभीर घटना गुरुवार, दि. ९‎ मार्चला सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास येथील‎ पांढरकवडा मार्गावरील गांधीनगर परिसरात घडली. सोनू‎ राठोड रा. जोड मोहा असे या अपघातात ठार झालेल्या‎ एका तरुणाचे नाव आहे. दुसरा ठार झालेला तरुण आणि‎ त्याचा गंभीर जखमी साथिदार हे दोघेही चंद्रपूर‎ जिल्ह्यातील रहिवासी आहे. अद्याप तरी त्यांची ओळख‎ पोलिसांना पटली नव्हती.‎ चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी असलेले दोन तरुण एका‎ दुचाकीने यवतमाळ कडून चंद्रपूर कडे जात होते.‎ दरम्यान, गांधीनगर कडून सोनू राठोड हा जोड मोहाकडे‎ दुचाकीने येत होता.

भरधाव दोन्ही दुचाकींवरील‎ चालकांचे नियंत्रण सुटले. त्यानंतर त्या दोन्ही दुचाकी‎ एकमेकींवर जाऊन आदळल्या. त्यामध्ये दुचाकींची‎ प्रचंड मोडतोड झाली. शिवाय, दोन्ही दुचाकींवरील‎ संबंधित तिघे जण गंभीर जखमी होऊन रस्त्यावर‎ कोसळले. त्यामध्ये सोनू आणि अन्य एक असे दोघेजण‎ जागीच ठार झाले. या घटनेची माहिती मिळताच वडगाव‎ जंगल पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक भास्कर‎ दरणे यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी‎ गंभीर जखमीला येथील शासकीय रुग्णालयात‎ उपचारासाठी दाखल केले. शिवाय, पंचनामा करून‎ सोनूसह अन्य एकाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी‎ पाठविला. वृत्तलिहिस्तोवर याप्रकरणी गुन्हा दाखल‎ करण्याची प्रक्रिया सुरू होती.‎

बातम्या आणखी आहेत...