आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निधीपासून शेतकरी वंचित‎:आ. बोदकुरवारांकडून अधिकाऱ्यांची कानउघाडणी‎

मारेगाव‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दिवाळी लोटूनही अद्याप शेतकऱ्यांच्या‎ खात्यात नैसर्गिक आपत्तीच्या दुष्काळ‎ निधीचे पैसे जमा न झाल्याने आमदार संजीव‎ रेड्डी बोदकुरवार यांनी शेकडो शेतकऱ्यांना‎ सह थेट तहसीलदार कार्यालयावर धडक‎ दिली. यावेळी आमदार बोदकुरवार यांनी‎ येथील अधिकारी, कर्मचाऱ्यांना जाब‎ विचारत चांगलीच कान उघाडणी केली. ‎

लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात नैसर्गिक ‎आपत्तीचा निधी जमा करायला लावू, अशी‎ उपस्थित शेतकऱ्यांना ग्वाही दिली.‎ मारेगाव तालुक्यात जून - जुलै महिन्यात‎ आलेल्या अतिवृष्टीच्या नैसर्गिक संकटाने‎ तर शेतकऱ्यांच्या हिरव्या स्वप्नांवर पाणी‎ फेरले.तालुक्यातील वर्धा नदी नाल्या‎ काठावरील शेत जमिनीमध्ये थेट पुराचे पाणी‎ शिरल्याने हजारो हेक्टरवरील शेतातील‎ उभ्या पिकांचे अतोनात नुकसान झाले.‎ दरम्यान सततच्या अतिवृष्टीमुळे‎ शेतकऱ्यांवर चक्क ती बार पेरणीची वेळ‎ आल्याने तालुक्यात आत्महत्यांच्या घटनेतही‎‎ सातत्याने वाढ झाली. शासन दरबारी याची‎ दखल घेत जिल्हा महसूल प्रशासनाने‎ तालुक्यातील २० हजार नुकसानग्रस्त‎ शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईपोटी तब्बल‎ ४५ करोड रुपयांचा निधी तालुका महसूल‎ प्रशासनाच्या खात्यात सुपूर्द केला.

परंतु‎ तालुक्यातील १०९ गावांपैकी काही तांत्रिक‎ कारणास्तव ऐन दिवाळीच्या तोंडावर केवळ‎ सत्तर टक्केच शेतकऱ्यांच्या खात्यात तो‎ निधी जमा झाला तर उर्वरित तीस टक्के‎ शेतकऱ्यांना दिवाळी लोटूनही प्रतिक्षाच‎ ‎ करावी लागत आहे. तसेच शासनाने हेक्टरी‎ १३ हजार ६०० रुपये नुकसान भरपाई जाहीर‎ केली असता, तालुक्यातील आकापूर,‎ लाखापूर, डोल डोंगरगाव, मचिंद्रा आदी‎ गावातील शेकडो शेतकऱ्यांच्या खात्यात‎ हेक्टरी केवळ नऊ ते दहा हजार रुपये‎ प्रमाणेच दुष्काळ निधी जमा झाला. यामुळे‎ संतप्त शेतकऱ्यांनी आमदार बोदकुरवार यांचे‎ कडे धाव घेतली असता आमदार‎ बोदकुरवार यांनी शेकडो शेतकऱ्यांसह‎ येथील तहसील कार्यालयावर धडक दिली‎

बातम्या आणखी आहेत...