आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यात्रा:पिंपळखुटा येथील संत भायजी महाराज यात्रा उत्सवाला प्रारंभ

वनोजा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगरुळपीर तालुक्यातील पिंपळखुटा संगम येथील अडाण व मडाण या नद्यांच्या संगमस्थळी असलेल्या संत भायजी महाराज तिर्थक्षेत्रावर रविवारपासून १३१ व्या यात्रा उत्सवाला प्रारंभ झाला आहे. रविवारी सकाळी ६ वाजता ‘रामकृष्ण विठ्ठल हरि नारायण’ या अखंड हरिनाम सप्ताहास सुरुवात झाली असून हा यात्रा उत्सव १६ एप्रिलपर्यंत सुरु राहणार आहे.

संत भायजी महाराजांनी १३१ वर्षापूर्वी रामनवमीनिमित्त यात्रा उत्सव सुरु केला हाेता. दरवर्षी गुढीपाडवा ते हनुमान जयंतीपर्यंत साजरा होणाऱ्या महोत्सवात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. ३ ते १० एप्रिलपर्यंत सकाळी ६ वाजेपर्यंत ‘राम कृष्ण विठ्ठल हरी नारायण’ नामाचा अखंड जयघोष होणार आहे. १२ ते १६ एप्रिलपर्यंत सकाळी ५ ते ६ वाजेपर्यंत पुंडलिक महाराज गावंडे व लक्ष्मण महाराज फुके यांच्या मार्गदर्शनाखाली काकड आरती, दुपारी २ ते ५ वाजेपर्यंत हभप प्रकाश महाराज यांच्या उपस्थितीत संत भायजी महाराज ग्रंथ पारायण, संध्याकाळी ६ ते ७ हरीपाठ होणार आहे. हनुमान जयंतीनिमित्त सकाळी ६ वाजता मंदीर प्रदक्षिणा व सकाळी ११ वाजता महाप्रसाद कार्यक्रम होणार आहे. तरी वरील कार्यक्रमाचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन गावकरी मंडळी व यात्रा उत्सव समितीने केले आहे.

बातम्या आणखी आहेत...