आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिग्रस तालुक्यातील खंडापूर येथील घटना:आत्महत्येस प्रवृत्त केले; चौघांविरुद्ध गुन्हा

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

२५ वर्षीय तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या चौघांविरुद्ध दिग्रस पोलिस ठाण्यात शनिवारी गुन्हे दाखल केले आहेत. ही घटना दिग्रस तालुक्यातील खंडापूर येथे १ फेब्रुवारीला उघडकीस आली. आकाश गजानन राठोड (२५) रा. खंडापूर असे मृत तरुणाचे नाव आहे.या प्रकरणी पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार, दिग्रस तालुक्यातील खंडापूर येथील आकाश राठोड याच्यासोबत नालीच्या बांधकामावर पाणी देण्याच्या कारणावरून रणजीत राठोड याच्यासह तिघांनी विनाकारण शाब्दिक वाद घातला होता.

त्यानंतर आकाश याला धाकदपट करीत अश्लील भाषेत शिविगाळ करण्यात आली. एवढ्यावरच ते थांबले नाही तर चक्क आकाश याला छेडखानी आणि बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात फसवून जेलची हवा खायला लावून शैक्षणीक आयुष्य बरबाद करीत जीवे मारून टाकण्याची धमकी दिली होती. त्यामूळे आकाश याने विषप्राशन करून आत्महत्या केली होती. रणजीत राठोड याच्यासह तिघांवर आकाश याच्या आत्महत्येस कारणीभूत म्हणून प्रथम श्रेणी न्यायालयाच्या आदेशावरून दिग्रस पोलिस ठाण्यात शनिवारी गुन्हे नोंद करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...