आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी; प्रहार जनशक्ती पक्षाचे तहसीलदारांना निवेदन

बाभुळगाव18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाभुळगाव तालुक्यात डिसेंबर २०२१ मध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाली होती. यामध्ये तालुक्यातील सरसकट शेतकऱ्यांच्या शेतातील तूर, हरभरा, गहू या पिकांसह भाजीपाला, फळ बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्या नुकसानीचा महसुल व कृषी विभागाकडून पंचनामे करून अहवाल शासन दरबारी पाठविण्यात आला होता. परंतु अद्याप पर्यंत गारपीट ग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई शासनाकडून देण्यात आली नाही. त्यामुळे प्रहार उपजिल्हाध्यक्ष प्रमोद कातरकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांना तहसीलदारांमार्फत निवेदन देण्यात आले.

गारपीटग्रस्तांना न्याय मिळावा यासाठी शासन दरबारी वारंवार पाठपुरावा करण्यात आला आहे. तरीही नुकसान भरपाईसाठी शासन उदासीन दिसून येत आहे. आजच्या घडीला असलेले महा विकास आघाडीचे सरकार हे शेतकरी हिताचे सरकार असल्याचे वारंवार बोलले जाते. परंतु आर्थिक विवंचनेत अडकलेल्या तालुक्यातील गारपीट ग्रस्त शेतक-यांना त्यांचे नुकसानीची भरपाई देण्यास सरकार दिरंगाई करीत आहे, असे दिसून येत आहे. बाभुळगाव तालुक्यातील गारपीटीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतक-यांना त्यांची नुकसान भरपाई देण्यात यावी. जेणे करून शेतक-यांना आर्थिक मंदीतून बाहेर काढण्यास मदत होईल. असे निवेदनात नमुद केले आहे.

बातम्या आणखी आहेत...