आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यशाळेचे‎ आयोजन:यवतमाळच्या सीएमसीएस महाविद्यालयात‎ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा‎

यवतमाळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्थानिक हरिकिसन जाजू‎ एज्युकेशन संस्था द्वारा संचालित कॉलेज ऑफ‎ मॅनेजमेंट अँड कॉम्प्युटर सायन्स, यवतमाळ येथे १‎ ऑक्टोबरला एक दिवसीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन‎ कार्यशाळेचे आयोजन केले. येत्या काळात मोठ्या‎ प्रमाणात स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून वेगवेगळ्या‎ विभागात सरकारी तसेच खासगी क्षेत्रात नोकरीच्या‎ संधी उपलब्ध होऊ शकता आणि या संधीचा‎ फायदा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना व्हावा, या‎ उद्देशाने एकदिवसीय स्पर्धा परीक्षा कार्यशाळेचे‎ आयोजन केले.

या कार्यशाळेचे मुख्य मार्गदर्शक‎ म्हणून युनिक अकॅडमी, पुणे शाखा नागपूरचे प्रा.‎ सचिन भुरे हे होते. विद्यार्थांना मार्गदर्शन करत‎ असताना विविध स्पर्धा परीक्षा तसेच राज्य सेवा‎ आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षा,‎ अभ्यासक्रम, येणाऱ्या अडचणी आणि त्यातून मार्ग‎ कसा काढायचा या विषयी मार्गर्शन केले.‎ कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य‎ रितेश चांडक यांच्या मार्गदर्शनात //"कॉम्पिटेटिव्ह‎ एक्झाम अँड करिअर गायडन्स सेल//" यांनी केले.‎ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुनील चिंते यांनी‎ केले, तर आभार प्रा. सुधीर वेळूकर यांनी मानले.‎

बातम्या आणखी आहेत...