आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदेश:मोफत धान्यासाठी मोबदला‎ मोजावा लागत असल्याची तक्रार‎

आर्णी25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात शासनाच्या अन्नसुरक्षा‎ विधेयका नुसार सर्व शिधा कार्डधारकांना मोफत‎ अन्नपुरवठा करण्याचे आदेश असताना सुध्दा‎ एका परवानाधारकाने चक्क वसुली सुरू केली‎ आहे. तसेच इतरही काही परवानाधारक मोफत‎ अन्नपुरवठ्यावर पैशाची आकारणी करत‎ असल्याचे निदर्शनास आले म्हणून एका‎ व्यक्तीने त्यांची तहसीलदाराकडे निवेदनाद्वारे‎ तक्रार केली. स्वस्त धान्य दुकानदार हे‎ अन्नपुरवठा करताना अवाजवी वसुली‎ अवैद्यरीच्या आकारत आहे. एकीकडे शासन‎ गरिबांना मोफत धान्य देत आहे आणि हे‎ दुकानदार प्रत्येक ग्राहकाकडून प्रत्येकी तीस‎ रुपयाची मागणी करीत आहे. करिता रहेमान‎ शहा यांनी तहसीलदार, जिल्हा पुरवठा‎ अधिकारी यांना निवेदन दिले.‎

बातम्या आणखी आहेत...