आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संस्कारक्षम:संस्कारक्षम युवा पिढी निर्माण करण्याचा ध्यास ;  मडाखेड येथील गुरुदेव सेवा मंडळाच्या पदाधिकाऱ्याचा सामाजिक उपक्रम

खामगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आजकाल समाज माध्यामांवर सक्रिय राहणारे पालक, जो-तो मोबाइल पाहण्यात गुंग असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येते. अनेकांचा आपसातील कौटुंबिक, सामाजिक संवाद कमी झाला आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे. त्यामुळेच संस्कारक्षम युवा पिढी निर्माण व्हावी, बालकांवर लहानपणापासूनच चांगले संस्कार व्हावे यासाठी समाज उपयोगी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची प्रेरणा घेऊन मडाखेड येथील श्री गुरुदेव सेवा मंडळातर्फे २०१४ पासून गायन, विविध उपक्रम स्वच्छता अभियान, वृक्षारोपण यासोबतच उन्हाळ्याच्या दिवसात पाण्या अभावी पक्षांना प्राणास मुकावे लागू नये यासाठी झाडांवर पाणी पात्र लावणे, त्यात पाण्याची व्यवस्था करणे, थोर पुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी साजरी करुन त्या माध्यमातून थोर पुरुषांनी केले कार्य जनतेपर्यंत पोहचणे, रामधून व सामूहिक प्रार्थना आदी कार्यक्रम राबवण्यात येत आहे. गावातील लोक प्लास्टिकच्या पिशव्या रस्त्यावर फेकतात, नालीत टाकतात. यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी मंडळातर्फे नुकतेच प्लास्टिक निर्मुलन मोहिम, प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर टाळावा यासाठी मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. प्लास्टिक निर्मूलन मोहिमेत गावचे सरपंच विजय कड, ग्रामसेवक पी.डी.कस्तुरे, रामदास कोकाटे, राष्ट्र धर्म युवा मंचचे बुलडाणा जिल्हा उपाध्यक्ष श्याम हागे, अमोल धोत्रे, राजेश देवकर, साहेबराव पाटील, वाळू गावंडे, वैभव देऊकार, रोहन झाल्टे, पंकज झाल्टे, राजेश सोनोने, उमेश हनमोडे यांच्यासह गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. आज गुरुदेव सेवा मंडळाच्या मालकीचे प्रार्थना मंदिर नाही. या प्रार्थना मंदिरासाठी ग्रामपंचायतीने दिड गुंठा जागा ही प्रार्थना मंदिरासाठी दिली आहे. या प्रार्थना मंदिरासाठी आमदार डॉ.संजय कुटे यांनी निधी उपलब्ध करुन दिली असल्याची माहिती विशाल हनतोडे यांनी दिली.

५० जलपात्रे लावली यंदा पक्ष्यांची तृष्णा भागवण्यासाठी गुरुदेव सेवा मंडळातर्फे मडाखेड येथील स्मशानभूमी, रोपवाटिका प्राथमिक आरोग्य केंद्र, गावातील दाट झाडे यासह अन्य ठिकाणी ५० जलपात्रे लावण्यात आली आहे. या जलपात्रातील पाणी पिऊन पक्षी आपली पाण्याची तहान भागवत आहे. रामधून मध्ये सात वर्षांपूर्वी मुले सहभागी होत असतात. मडाखेड बसथांब्यापासून रामधूनला सुरुवात होते आणि गावातील गजानन महाराज मंदिराजवळ समारोप होतो.      निस्वार्थ भावनेने कार्य   आचार्य हरिभाऊ वेरुळकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुदेव सेवा मंडळाचे कार्य आठ वर्षापासून सुरु आहे. कोणताही स्वार्थ न ठेवता केवळ सेवाभावाच्या उद्देशाने मंडळाचे कार्यकर्ते कार्य करीत आहे. माझ्या व श्याम हागे यांच्या प्रयत्नातून मंडळाशी गावातील सर्वस्तरातील लोक जुळले आहे. - विशाल हनतोडे, कार्यकर्ता श्री गुरुदेव सेवा मंडळ मडाखेड

बातम्या आणखी आहेत...