आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महेश नवमी:उमरखेड येथे महेशोत्सवाची सांस्कृतिक कार्यक्रमाने सांगता

उमरखेड20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माहेश्वरी संघटन, महिला संघटन, युवा संघटन यांचे संयुक्त विद्यमाने महेशोत्सव साजरा करण्यात आला. महादेवाच्या आशीर्वादाने ज्या समाजाची उत्पत्ती झाली त्या समाजाचा ५१५५ वा वंशोत्पती दिन महेश नवमी मोठ्या हर्षोल्हासात साजरी करण्यात आली. प्रसिद्ध उत्तरेश्वर मंदिरात अभिषेक पूजन करून मानव जातीच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी चार वाजता भंडारी ऑइल मिल ते शहराच्या मुख्य भागातून शोभायात्रा काढण्यात आली.

तालुक्यातील संपूर्ण राजस्थानी समाजाचे असंख्य समाज बांधव भगिनी या शोभायात्रेत उपस्थित होत्या. शोभायात्रा सेठ. सारडा राजस्थानी भवन येथे पोहोचली. ठिक ठिकाणी या शोभा यात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले. ब्राह्मण समाज यांनी आईस्क्रीम, अग्रवाल समाजाने थंडाई देऊन सर्वांचे स्वागत केले. त्यानंतर सायंकाळी सहा वाजता महेशोत्सव हा मुख्य कार्यक्रम व पुरस्कार वितरण पार पडले. या कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष पवन पनपालिया, मुख्य अतिथी म्हणून भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भूतडा, प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा महिला संघटनेचे अध्यक्ष अलका श्री गोपाल भट्टड, सचिव साधना प्रेमकुमार बाहेती, प्रशांत मोदाणी दिग्रस, मांगीलाल जांगीड विजय भुतडा, राधिका भट्टड, अभिषेक भंडारी, महेश करवा, राजकुमार भंडारी, ओमप्रकाश सारडा, संदीप भट्टड उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...