आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुवर्णपदक देऊन सन्मान:नौदलात निवड झाल्याबद्दल‎ निनाद अवस्थी याचा सत्कार‎

वाशीम2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील श्री बाकलीवाल विद्यालयाचा माजी‎ विद्यार्थी निनाद अवस्थी याची भारतीय नौदलात उच्च‎ अधिकारी पदावर निवड झाला. या निवडीबद्दल निनादचा‎ शाळेच्या वतीने मंगळवार दि. ११ एप्रिल रोजी सत्कार‎ करण्यात आला. निनादचे दहावीपर्यंतचे शिक्षण‎ बाकलीवाल शाळेत पूर्ण झाले. निनादला एनसीसी‎ अधिकारी अमोल काळे यांचे मार्गदर्शन लाभले.‎ एनसीसीमधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्याला अमरावती‎ येथे बिग्रेडीयर यांच्या हस्ते सुवर्णपदक देऊन सन्मानित‎ करण्यात आले होते. बारावीपर्यंतचे शिक्षण अकोला येथे‎ पूर्ण केल्यानंतर त्याची केरळमध्ये आयएनएस गरुडा‎ युनिटमध्ये प्रशिक्षणासाठी निवड झाली. प्रशिक्षण पूर्ण‎ करुन नुकताच घरी परतलेल्या निनादचा शाळेच्या वतीने‎ सत्कार करण्यात आला.‎