आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस आक्रमक:‘ईडी’ विरोधात काँग्रेस आक्रमक ; घोषणाबाजी करीत निषेध नोंदवण्यात आला

यवतमाळ14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या ईडी चौकशीच्या विरोधात जिल्हा काँग्रेस कमिटीने शुक्रवार, दि. १७ जूनला धरणे आंदोलन केले. त्यानंतर शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाले. यावेळी तिरंगा चौकात शेकडो पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पोलिसांनी स्थानबद्ध केले. यावेळी केंद्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करीत निषेध नोंदवण्यात आला. राहुल गांधी यांच्यावरील कारवाई सूड बुद्धीने केली जात आहे. केंद्रातील बहिर्‍या व मुक्या सरकारला असंतोषाचा हा आवाज पोहोचवण्यासाठी हे आंदोलन असल्याचे काँग्रेस नेत्यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या विरोधातील आमचा हा संघर्ष सुरूच राहील, असे त्यांनी यावेळी जाहीर केले. कोणताही अप्रिय घटना घडू नये, यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलन स्थळांकडे येणार्‍या मार्गावर बॅरिकेट्स लावण्यात आले होते. या आंदोलनात काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष शिवाजीराव मोघे, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. प्रफुल्ल मानकर, बाळासाहेब मांगुळकर, माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर, विजय खडसे, विजया धोटे, संजय ठाकरे, प्रविण देशमुख, तातु देशमुख, स्वाती येंडे, माजी अर्थ व बांधकाम सभापती राम देवसरकर, जावेद अन्सारी, कृष्णा पुसनाके, नगरसेवक वैशाली सवाई, दर्शना इंगोले, शहराध्यक्ष चंद्रशेखर चौधरी, दिनेश गोगरकर, विशाल पावडे, शेतकरी नेते अशोक भुतडा, उषा दिवटे, पल्लवी रामटेके, प्रदीप वानखडे, अनिल आडे, अतुल राऊत, विक्की राऊत, विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष कौस्तुभ शिर्के, ललित जैन, नंदु ठाकरे, यांच्यासह, कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...