आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निषेध:वाढत्या महागाईविरोधात काँग्रेस आक्रमक; बसस्थानक चौकामध्ये टायर पेटवून निषेध

यवतमाळ8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाढत्या महागाई विरोधात काँग्रेस आक्रमक झाली असून शुक्रवार, दि. ५ ऑगस्टला बसस्थानक चौकात टायर पेटवून निषेध नोंदवण्यात आला. यावेळी महिला काँग्रेसने रस्त्यावर चूल मांडून निषेध नोंदवला तर विद्यार्थी काँग्रेसने प्रतिकात्मक सिलिंडर पेटवत रास्तारोको आंदोलन केले.

जीवनावश्यक वस्तूंचे भाव दररोज वाढत आहे. पेट्रोल डिझेलच्या भावाने शंभरी पार केली आहे. सर्वसामान्य जनता त्रस्त झालेली आहे. मात्र याकडे लक्ष द्यायला केंद्र सरकारकडे वेळ नाही. त्यामुळे जनतेच्या मनात मोदी सरकार विरोधात संतप्त भावना निर्माण झाली आहे. काँग्रेस सर्व सामान्यांच्या पाठीशी ताकदीने उभी असून केंद्र सरकारला जागे करण्यासाठी काँग्रेसने देशभरात महागाई मुक्त भारत आंदोलन उभे केले आहे.

शुक्रवारी शहरातील बसस्थानक चौकात काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी रास्तारोको आंदोलन करीत सिलिंडरच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. जिल्ह्यात अतिवृष्टीने शेती खरडून गेली आहे. शेतकर्‍यांचा हंगाम हातून गेला आहे. असे असतानाही केंद्र, राज्य शासनाकडून मदत मिळालेली नाही. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये सुध्दा सरकार विरुध्द संताप आहे. सरकारच्या या तुघलकी निर्णयांच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांचा राग अनावर झाला. जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. रस्त्यावर उतरुन काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली. पोलिसांनी हस्तक्षेप करीत प्रमुख पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांना स्थानबद्ध केले.

या आंदोलनात माजी मंत्री प्रा. वसंत पुरके, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. प्रफुल्ल मानकर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, मुंबई बाजार समितीचे संचालक प्रविण देशमुख, राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संजय ठाकरे, शहराध्यक्ष चंद्रशेखर चौधरी, दिनेश गोगरकर, अरुण राऊत, आनंद शर्मा, गुड्डू जवादे, जावेद अन्सारी, ओम तिवारी, उषा दिवटे, दर्शना इंगोले, पल्लवी रामटेके, प्रा.बबलु देशमुख, छोटू पावडे, प्रविण सवाई, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवि ढोक,विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कौस्तुभ शिर्के, विक्की राऊत, ललित जैन, उमेश इंगळे, अजय किन्हीकर, प्रदीप डंभारे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

महागाई विरोधात जेलभरो
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा, अनेकांचे घरे, शेत जमिनी वाहुन गेल्या, त्यांना मोबदला देण्यात यावा, देशात पेट्रोल, डिझेलवर जीएसटी लावण्यात आली असून आता गहु, तांदुळ, दुध, दहीवर देखील जीएसटी लावण्यात आला आहे. त्यामूळे जिल्ह्यात जेल भरो आंदोलन करण्यात आले. प्रफुल्ल मानकर, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस.

सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील
सर्वसामान्य नागरिकांना रोज लागणार्‍या आवश्यक वस्तूंवर सुध्दा जीएसटी लावण्यात आला आहे. त्यामुळे खाद्यपदार्थांची दरवाढ झाली आहे. या भाववाढीने सर्वसामान्य नागरिकांचे जगणे मुश्कील झाले आहे. मात्र, सरकार दखल घेण्यास तयार नाही. त्यामुळे काँग्रेसने रास्तारोको करीत केंद्र सरकारचा निषेध नोंदविला.
बाळासाहेब मांगुळकर, माजी. जि.प. उपाध्यक्ष.

बातम्या आणखी आहेत...